Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

त्या दोघी घरच्यांशी खोटं बोलून निघाल्या; नमनने न विचारता गाडी काढली अन् नंतर घडला अनर्थ, एका क्षणात सर्व उध्वस्त…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 25 September 2026, 16:50

जमशेदपूर: सोनारी मरीन ड्राइव्हवरील कार अपघाताने अनेक कुटुंबांचा आनंद एका क्षणात हिरावून घेतला. या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आदल्या रात्री मुलासोबत दुकान बंद करून घरी जेवण केले, त्याला ऑनलाइन क्लास करताना पाहिले आणि काही तासांतच त्याच्या मृत्यूची बातमी ऐकावी लागल्याचे नमनचे वडील राजीव गुप्ता यांनी सांगितले.

बिष्टुपूरमध्ये इलेक्ट्रिकल आणि बेकरीचे दुकान चालवणारे राजीव गुप्ता यांनी सांगितले की, बुधवारी रात्री सुमारे ११ वाजता त्यांनी आणि त्यांचा मुलगा नमनने दुकान बंद केले. रात्री ११.३० वाजता दोघे घरी पोहोचले आणि एकत्र जेवण केले. त्यानंतर नमनने ऑनलाइन क्लास सुरू केला. अभ्यासात हुशार असलेला नमन क्लास पूर्ण केल्यानंतर मित्रांना भेटण्यासाठी कार घेऊन रात्री उशिरा घराबाहेर पडला. मात्र, तो बाहेर गेल्याची माहिती कुटुंबीयांना नव्हती. सकाळी अपघाताची बातमी समजल्यानंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

या अपघातात मृत्यू झालेला सार्थक हाही सोनारी कॉन्ट्रॅक्टर एरियातील रहिवासी होता. त्याचे वडील चेतन अग्रवाल आणि आई केदारनाथच्या यात्रेसाठी गेले होते. हरिद्वारला पोहोचल्यानंतर त्यांना मुलाच्या मृत्यूची बातमी मिळाली. त्यानंतर ते तातडीने दिल्लीला गेले आणि तेथून विमानाने रांचीला पोहोचले. रात्री उशिरा रस्त्याने जमशेदपूर गाठले. सार्थकवर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सार्थक हा बास्केटबॉल आणि क्रिकेटचा उदयोन्मुख खेळाडू होता. त्याने आयसीएसई राष्ट्रीय कनिष्ठ स्पर्धा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये कार्मेल स्कूलचे प्रतिनिधित्व केले होते. अभ्यासातही तो हुशार होता. त्याचे वडील कमर्शियल टॅक्स वकील आहेत. सार्थकला एक धाकटा भाऊ असून तो कार्मेल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे.

 

या अपघातातील वंशिका खंडेलवाल ही आदित्यपूरमधील इमली चौक येथील रहिवासी पंकज खंडेलवाल यांची १७ वर्षांची मुलगी होती. तिने युविकाच्या घरी जाऊन अभ्यास करण्यासोबतच रात्री तिथेच मुक्काम करण्याचे पालकांना सांगितले होते. वंशिका यापूर्वीही युविकाच्या घरी गेली असल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला जाण्याची परवानगी दिली.

वंशिका युविकाच्या कदमा येथील ‘दिवली एन्क्लेव्ह’मधील घरी पोहोचली होती. युविकानेही आपल्या वडिलांना वंशिकाच्या घरी अभ्यासासाठी आणि मुक्कामासाठी जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र, रात्री उशिरा दोघी अन्य दोन तरुणांसह मरीन ड्राइव्हच्या दिशेने गेल्या आणि त्यांचा अपघात झाला.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी धावून आले राज्यातले IAS आणि IPS अधिकारी! राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार स्वतःचा १ दिवसाचा पगार; वाचा सविस्तर

Friday, 16 October 2026, 20:40

पुढच्या वर्षीपासून लागू होणार ८वा वेतन आयोग? काम कुठपर्यंत आलं? काय-काय घडलं, जाणून घ्या सर्व अपडेट्स..

Friday, 16 October 2026, 20:36

फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई! अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 16 October 2026, 18:53

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा; पुणेकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर! धरणातील पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मुंढवा जॅकवेल पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी

Friday, 16 October 2026, 18:31

अलिबागच्या लॉजवर तरुणाचा गूढ अंत! होणाऱ्या पत्नीसोबत फिरायला गेला, पण घडलं भयंकर; मृत्यूचं गूढ वाढलं!

Friday, 16 October 2026, 17:54

पुण्यात लोणीकंदमध्ये ३ जणांनी अचानक तरुणाला घेरलं! चेहऱ्यावर, गळ्यावर, छातीवर कोयत्याने सपासप वार; भररस्त्यात खुनाचा थरार…

Friday, 16 October 2026, 17:36
Next Post

पदवीधर असूनही झटपट श्रीमंत होण्याची घाई! पुण्यातल्या तरुणानं पैशांसाठी निवडला भलताच मार्ग; सत्य समजताच पोलिसही हैराण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp