जपान : भारतात आजही लोक घर दिशा बघून तसेच सकारत्मक वास्तू बघून विकत घेतात. पण जपानमध्ये सध्या भुतिया घर घेण्याची क्रेज वाढली आहे. याचे कारण वाचून तुम्हाला धक्का बसेल. टोकियो, चिबा सारख्या मोठ्या शहरांमध्ये हा ट्रेंड सुरु आहे. याठकाणी सध्या भुतिया घरांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

याठिकाणी अशी घरे शोधली जात आहेत ज्या घरांमध्ये एखाद्याची हत्या झाली आहे किंवा कोणी आत्महत्या केली आहे किंवा एखाद्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि त्याचा मृतदेह बऱ्याच दिवसांनी सापडला आहे. अशा घरांना याठिकाणी मागणी वाढली असून, लोकांमध्ये अशी घरे घेण्यासाठी स्पर्धा सुरु आहे.

काझुतोशी कोडामा, जपानचा पहिला असा व्यक्ति आहे जो नकारत्मक शक्तींना ओळखून नागरिकांना घर विकत घेण्यास सुचवत आहे. तो अशा घरांसाठी भूतमुक्त प्रमाणपत्रे देखील देत आहे. काझुतोशी अशा नकारत्मक घरांमध्ये राहून काही वेगळ्या हालचाली जाणवतात का किंवा काही नकारात्मक शक्ती जाणवते का? याचा अभ्यास करून त्या घराला प्रमाणपत्र देत आहेत. त्यांनी प्रमाणपत्र दिल्यानंतर नागरिक ही घरं विकत घेण्यासाठी गर्दी करत आहेत.
अशा घरांना मागणी का वाढली ?
खरं तर टोकियोसारख्या शहरात मालमत्तेच्या किमती गगनाला भिडत आहेत. अशातच सामान्य लोकांना घर घेणे परवडत नसल्याने लोक अशा घरांकडे वळत आहेत. कारण अशा मालमत्ता बाजारभावापेक्षा ८० टक्के पर्यंत स्वस्त आहेत.







