बांगलादेश : आरक्षणाच्या आगीत होरपळत असलेल्या बांगलादेशातील परिस्थिती पाहता सर्वोच्च न्यायालयाने नोकऱ्यांमधील आरक्षणाचा निर्णय मागे घेतला आहे. बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने रविवारी (दि. २१) हा निर्णय दिला आहे. त्यामुळे देशभरात अशांतता पसरली असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात गुणवत्तेच्या आधारावर ९३% सरकारी नोकऱ्यांचे वाटप करण्याचे आदेश दिले, तर १९७१ च्या बांगलादेशी स्वातंत्र्ययुद्धात लढलेल्या सैनिकांच्या कुटुंबांसाठी ७% शिल्लक आहेत. आतापर्यंत ३० टक्के नोकऱ्या अशा लोकांसाठी राखीव होत्या.
आरक्षणासंदर्भात आठवडाभरापासून बांगलादेशात सुरू असलेल्या या हिंसक आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, सरकारने सर्व कार्यालये आणि संस्था बंद ठेवण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. त्याचवेळी देशात कडक संचारबंदी लागू करण्यात आली होती. पोलिसांनी हल्लेखोरांना पाहताच गोळ्या घालण्याच्या सूचना सरकारने दिल्या होत्या.
BREAKING: Bangladesh’s top court scales back job quotas that sparked deadly unrest: attorney-general pic.twitter.com/ssSN3Vort8
— AFP News Agency (@AFP) July 21, 2024