नवी दिल्ली : कोण्याही जोडप्यासाठी आपल्या लग्नानंतरची पहिली रात्र खूप खास अशी असते. काही ते जण टेक्शन फक्त आपल्यादोघांचे म्हणून खाजगी ठेवतात तर काही सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी आपल्या या खास क्षणाचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. असच एक नवविवाहित कपल ज्यांनी आपल्या हनीमूनच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो सद्या तुफान व्हायरल होतो आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवविवाहित जोडपं लग्नानंतर हनीमून साजरा करण्यासाठी मनालीला गेल्याची माहिती या पोस्टमध्ये देण्यात आली आहे. इथं हनीमूनच्या पहिल्या रात्री बंद खोलीत त्यांनी नेमकं काय काय केलं आहे, याचा संपूर्ण व्हिडीओ बनवून तो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
व्हिडीओत बघायला मिळत आहे की, पती-पत्नी एकत्र बसले आहेत. समोर टेबल आहे, ज्यावर केक आणि शॅम्पेन आहे. तसंच फुलांनी सजवलेला बेडही आहे. कपल कशापद्धतीने एकत्र केक कापून एकमेकांना भरवतात, नंतर एकत्र शॅम्पेन पितात, बेडवर एकत्र बसतात हे सगळं व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे. तसे हे क्षण त्यांचे खासगी पण त्यांनी सोशल मीडियावर सगळ्यांसोबत शेअर केले आहेत. shaonmitra_and__ankita_16 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ बरेच लोक आनंदाने पाहत आहेत.
हनीमून शब्दाचा अर्थ नेमका काय?
हनीमून हा इंग्रजी शब्द असून हनी म्हणजेच ‘मध’ आणि मून म्हणजेच ‘चंद्र’ या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. हनीमून या शब्दातील ‘हनी’ चा अर्थ म्हणजे लग्नातील मधुरता आणि आनंद. लग्नानंतर लगेच मिळणाऱ्या आनंदाला या शब्दाशी जोडण्यात आलं आहे.