नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेवरील दिलेला निर्णय न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. शिंदे गटाने उच्च न्यायालयात तर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देत याचिका दाखल केल्या होत्या. यावर उच्च न्यायालयाने नोटीसा पाठविलेल्या असताना सोमवारी सर्वोच्च न्यायालयानेही नोटीसा पाठविल्या आहेत. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. सर्वोच्च न्यायालयानेच ठाकरे गटाचा प्रतोद, व्हीप अधिकृत असल्याचे म्हटले होते, त्याविरोधात जात राहुल नार्वेकरांनी निकाल दिला आहे. यावरून उद्धव ठाकरेंनी दोन्ही निकालांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर २२ जानेवारीला नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘खरी’ शिवसेना घोषित करण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाविरोधात उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे. ठाकरे गटाच्या आमदारांना का अपात्र ठरविले नाही, या मुद्द्यावरून शिंदे गटाने नार्वेकरांच्या निर्णयाला याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.
#BREAKING #SupremeCourt issues notice on Uddhav Sena’s petition challenging Maharashtra Speaker’s refusal to disqualify Shinde Sena members.#SupremeCourtofIndia https://t.co/6n3YigJm6I
— Live Law (@LiveLawIndia) January 22, 2024