नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी 10 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना नियमित जामीन मंजूर केला आहे.
सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये केजरीवाल यांना कोर्टाने दिलासा दिला आहे. तब्बल 177 दिवसांनंतर केजरीवाल हे तुरुंगातून बाहेर येणार आहेत.
सीबीआयने केजरीवाल यांना 26 जून रोजी दारू धोरण प्रकरणी अटक केली होती. या अटकेला बेकायदेशीर ठरवत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी जामीन याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. दरम्यान, केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला असला तरी ते आता तुरुंगात राहणार की बाहेर येणार हेदेखील पाहावे लागणार आहे.
Supreme Court grants bail to Delhi Chief Minister and AAP national convener Arvind Kejriwal in a corruption case registered by CBI in the alleged excise policy scam.
Supreme Court says prolonged incarceration amounts to unjust deprivation of liberty. pic.twitter.com/6LoZkISNO4
— ANI (@ANI) September 13, 2024