न्यू हॅम्पशायर : असं म्हणतात की, मृत झालेली व्यक्ती कधीच परत येत नाही, हे एक कटुसत्य आहे. पण याला आव्हान देणारी एक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता, मात्र तो जिवंत झाला, तोही अवघ्या २५ मिनिटांत. होय, या मुलाचे कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक याला चमत्कार म्हणत आहेत. हा चत्मकार घडला कसा, या घटनेचे उत्तर सर्वजण शोधत आहेत.
हे प्रकरण ब्रिटनमधील न्यू हॅम्पशायरमधील आहे. २० वर्षीय चार्ली व्हिन्सेंट मृत्यूला हरवून पुन्हा जिवंत झाला. तो एका उन्हाळी शिबिरात कॅनोइंग प्रशिक्षक होता. तेव्हा चार्लीला उष्माघाताचा प्रचंड त्रास झाल्याने त्याचा मृत्यू झाला, पण मृत्यूनंतर २५ मिनिटांनी तो पुन्हा जिवंत झाला.
उन्हाच्या तीव्रतेने झाला उष्माघात
या तरुणावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, चार्ली सतत उन्हात राहिल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्याच्या पायाला आग होऊ लागली. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याला न्यूमोनियासह उन्हाचा तीव्र त्रास झाल्याने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केली. त्यादरम्यान, त्याला हृदयाविकाराचा छोटासा झटका आला. हृदयाचे ठोके बंद पडल्याने त्याचा मृत्यू झाला.
हृदयाचा वाढला आकार
चार्लीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, जेव्हा त्यांच्या मुलाच्या हृदयाचे ठोके बंद पडले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत मानले होते. मात्र २५ मिनिटांनी हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले. चार्लीची २४ वर्षीय बहीण एमिली व्हिन्सेंटने शस्त्रक्रियेच्या टेबलावर तिच्या भावाला पुन्हा जिवंत होतानाचा चत्मकार बघितला. डॉक्टरांनी सांगितले की, याला कार्डियोमेगालीसुद्धा म्हणतात. ज्यामध्ये हृदयाला सामान्य स्थितीपेक्षा जास्त काम करावे लागले. आता व्हिन्सेंट बरा होत आहे.