नवी दिल्ली : ‘जम्मू की धडकन’ म्हणून सोशल मीडियावर लोकप्रिय असलेली रेडिओ जॉकी सिमरन सिंहने गुरुग्राम येथील राहत्या घरी आत्महत्या केली. इन्स्टाग्रामवर ७ लाख फॉलोअर्स असलेली इन्फ्लुएन्सर सिमरनने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.
गुरुग्रामच्या सेक्टर ४७ मधील एका अपार्टमेंटमध्ये ती भाड्याने राहत होती. तिथेच बुधवारी रात्री ती फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिच्यासोबत राहणाऱ्या मित्राने ही बाब पोलिसांना कळवली होती. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी तिला तत्काळ रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या मृतदेहाजवळ कोणतीही चिठ्ठी सापडली नाही. त्यामुळे तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होत नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.