मुख्यमंत्री असावा तर असा… बंगळुरूमधील मुख्यमंत्र्यांच्या ‘हा’ घेतला निर्णय ; सिद्धरमय्या यांनी दिले आदेश
Siddaramaiah News : बंगळुरू : कर्नाटक राज्यात एकाहाती मिळवल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून सिद्धरमय्या यांनी शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी थेट कामाला सुरुवात केली असून ते अॅक्शन मोडमध्ये आहेत. त्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला असून त्यांचे आता कौतुक केले जात आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होताच त्यांनी कामांचा सपाटा लावला आहे. नवनिर्वाचित सिद्धरमय्या (Siddaramaiah News) सरकारच्या पहिल्या कॅबिनेट मिटिंगमध्ये त्यांनी सर्वात आधी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली. त्यानंतर रविवारी (21 मे) रोजी त्यांनी एक विशेष आदेश जारी केला. ज्यामध्ये त्यांनी बंगळुरू पोलिसांना मुख्यमंत्र्यांसाठीचा ‘झिरो ट्रॅफिक प्रोटोकॉल’ मागे घेण्यास सांगितलं.
सीएम सिद्धरमय्या म्हणाले की, लोकांच्या समस्या लक्षात घेऊनच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. (Siddaramaiah News) सिद्धरामय्या यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. रविवारी सिद्धरमय्या यांनी ट्वीट केलं की, “मी बंगळुरू शहर पोलीस आयुक्तांना माझ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी ‘झिरो ट्रॅफिक प्रोटोकॉल’ मागे घेण्यास सांगितलं आहे.
लोकांच्या समस्या लक्षात घेऊन निर्णय
लोकांच्या समस्या पाहून मी हा निर्णय घेतला आहे. जिथे ‘झिरो ट्राफिक प्रोटोकॉल’ लागू करण्यात आला आहे, तिथे लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो.” दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या ट्वीटवर प्रतिक्रिया देत त्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. (Siddaramaiah News) अनेक युजर्सनी ‘आऊटस्टॅडिंग सीए’, असं म्हणत कमेंट केल्या आहेत. तर काहींनी ‘मुख्यमंत्री असावा असा’, असं म्हणत सिद्धरमय्या यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
konkan news: कर्नाटकातून आलेल्या आंब्याची हापूस आंबा म्हणून विक्री