Donald Trump Assassination Attempt : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गेल्या दोन महिन्यांत दुसऱ्यांदा प्राणघातक हल्ला झाला आहे. वेस्ट पाम बीच येथील गोल्फ कोर्समध्ये ट्रम्प गोल्फ खेळत होते. त्यामुळे ट्रम्प यांना लक्ष्य करण्यात आल्याचे बोलले जात आहे. रविवारी फ्लोरिडा येथील गोल्फ क्लब येथे गोळीबाराची घटना घडली आहे. दरम्यान, माजी राष्ट्राध्यक्ष आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार ट्रम्प यांनी स्वत: सुरक्षित असल्याची माहिती दिली.
प्राथमिक तपासात ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु ते सुरक्षित असल्याचं सुरक्षा दलानी सांगितलं आहे. हल्लेखोर आणि ट्रम्प यांच्यात सुमारे 400 यार्डांचे अंतर होते. संशयिताला एके-47 रायफलसह अटक करण्यात आली आहे. झुडपात लपलेले आरोपी आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर आपल्या पहिल्या वक्तव्यात ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन केले. मी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि कधीही शरणागती पत्करणार नाही असे या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेच्या उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी याबाबत म्हटलं की, “माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर फ्लोरिडा येथील गोल्फ कोर्सजवळ गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. ते सुरक्षित असल्याचा मला आनंद आहे.”
दरम्यान, माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर दोन महिन्यात दुस-यांदा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
I have been briefed by my team regarding what federal law enforcement is investigating as a possible assassination attempt of former President Trump today.
A suspect is in custody, and I commend the work of the Secret Service and their law enforcement partners for their…
— President Biden (@POTUS) September 16, 2024