केरळ : इडली ही दक्षिण भारतीय पदार्थ असून अनेकांच्या आवडीचा आहे. हा एक लोकप्रिय आणि तितकाच आरोग्यादायी असा नाश्ता आहे. पण इडली खाल्ल्याने एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. हो केरळमध्ये अशी धक्कादायक घटना घडली आहे. इडली खाण्याच्या स्पर्धेत भाग घेणे एका व्यक्तीच्या जिवावर बेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केरळमध्ये ओणम उत्सव सुरु होता, त्यादरम्यान उत्सवात खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धा जिंकण्यासाठी त्या व्यक्तीने इडली जास्त खाल्ल्या. यावेळी 49 वर्षाच्या व्यक्तीचा ईडली खाताना श्वास कोंडला गेल्याने मृत्यू झाला आहे.
त्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु इडली खाताना श्वास कोंडला गेल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. वायलार पोलिसांनी या प्रकरणात अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.