मुंबई : मल्याळम सिनेसृष्टीतून मोठी बातमी समोर येत आहे. लैंगिक छळाचे आरोप उघड झाले आहे. हेमा कमिटीच्या रिपोर्टनतंर #MeeToo2.O सुरू झालं आहे. अभिनेत्री श्रीलेखा मित्रा हिनं केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपानंतर प्रिसिद्ध फिल्ममेकर रंजीत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमा कमिटीच्या रिपोर्टनंतर रंजीतवर हा दुसरा आरोप लावण्यात आला आहे.
ऑडिशन ऐवजी केली मारहाण..
ANIने दिलेल्या माहितीनुसार, पीडीत अभिनेत्रीने सांगितलं, रंजीतने एका ऑडिशनसाठी तिला बंगळुरूला बोलावलं. ऑडिशन ऐवजी मारहाण केली. रंजीतने तिला सगळे कपडे काढायला सांगितले आणि तिला मारहाण केली. अभिनेत्रीला आधी वाटलं की ऑडिशनसाठी बोलावलं आहे पण तिथे गेल्यानंतर तिला खरी परिस्थिती कळली.
रंजीतने माझे फोटो पाठवले..
अभिनेत्रीनं दावा केला आहे की, दुसऱ्या दिवशी रंजीतने तिला गप्प बसण्यासाठी पैशांची ऑफर दिली. अभिनेत्रीनं सांगितलं, त्याने मला नेकेड होऊन उभं राहण्यास सांगितलं. तो एका अभिनेत्रीशी बोलत होता. रेवती असं तिचं नाव होतं मी पहिल्यांदा तिचं नाव ऐकलं. तो मला म्हणाला, ही रेवती होती. त्या दोघांमध्ये काय नाते आहे हे मला माहिती नाही पण रंजीतने माझे फोटो तिला पाठवले.
फिल्ममेकर रंजीत विरोधात 2009 साली पलेरी माणिक्यम: ओरू पथिरकोलापथकथिंते कथा या सिनेमाच्या ऑडिशन वेळी एका बंगाली अभिनेत्रीनं लैंगिक शोषणाचे आरोप केले होते त्यानंतर FIR दाखल केली. केरळ पोलिसांनी रंजीत विरोधात गुन्हा दाखल केला होता.
जबरदस्तीने मागून पकडलं..
अभिनेत्री मीनू मुनीर हिनं सुद्धा अभिनेता सूर्या आणि मुकेश यांच्याविरोधात आवाज उठवला. फिल्मच्या सेटवर अभिनेत्री मीनू हिला टॉयलेटच्या बाहेर मागून पकडून तिला जबरदस्ती किस केल्याचा आरोप तिने केला आहे. प्रसिद्ध पॉलिटिशिअनविरोधातही तिनं आवाज उठवला. अभिनेत्रीचा तक्रारीनंतर अभिनेता सूर्या आणि मुकेश यांच्याविरोधात केरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती मिळत आहे.