बुलंदशहर : जेवण करत असताना अचानक गॅस लीक होऊन भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की घराचं छप्पर कोसळलं. या भीषण दुर्घटनेमध्ये 6 जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन मजली घर या स्फोटात कोसळल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील सिकंदराबाद पोलिस स्टेशनच्या गुलावठी रोडवर असलेल्या आशापुरी कॉलनीमध्ये घडली आहे. सिलिंडरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर चार जणांची प्रकृती गंभीर आहे.
थाना सिकन्द्राबाद क्षेत्रान्तर्गत घटित सिलेन्डर फटने की घटना के सम्बंध में वरिष्ठ पुलिस अधीक्षक श्री श्लोक कुमार की बाइट।#UPPolice #bulandshahrpolice pic.twitter.com/g4udKzZurL
— Bulandshahr Police (@bulandshahrpol) October 21, 2024
राजू उर्फरियाजुद्दीन वय 50 वर्ष, रुखसाना, राजूची पत्नी, 45 वर्ष, सलमान, राजूचा मुलगा, 16 वर्ष, तमन्ना, राजूची मुलगी, 24 वर्ष, हिवजा, तमन्ना यांची मुलगी, 30 वर्ष, आस मोहम्मद, मुलगा राजू, वय 26 अशी मृतांची नावं आहेत. जखमींमध्ये सिराज उर्फसिराजुद्दीन मुलगा राजू, 30 वर्ष, शाहरुख मुलगा राजू, 28 वर्षे आणि अन्य दोघे जखमी असून त्यापैकी शाहरुखला दिल्लीला रेफर करण्यात आले आहे.
घरात जेवण करत असताना गॅस लिक होऊन अचानक स्फोट झाला. सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस आणि प्रशासन अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि ढिगारा हटवला आहे. जेसीबीच्या साहाय्याने पत्रा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या सर्व लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. श्वान पथकाच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.