Airplane accident : वॉशिंग्टनहून येणारे PSA फ्लाइट आणि न्यूयॉर्कला जाणारे एंडेव्हर एअर फ्लाइट एकमेकांपासून सुमारे 700-1000 फूट अंतरावर उभे होते. PSA एअरलाइन्स 5511 मध्ये 75 प्रवासी आणि चार क्रू सदस्य होते. त्याच वेळी, एंडेव्हर एअर 5421 मध्ये 76 प्रवासी आणि चार क्रू सदस्य होते.
विमानांची समोर समोर ट्क्कर होऊन अपघात झाल्याच्या बातम्या वाचनात येत असतात. अशीच एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना अमेरिकेत घडली आहे. न्यूयॉर्कमधील सिराक्यूज हॅनकॉक आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकाशात दोन विमानांची टक्कर होता होता राहिली. परंतु थोडक्यात हा अपघात टळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नॉर्थ सिराक्यूज पोलीस विभागाच्या गस्ती कारवर बसवलेल्या कॅमेऱ्याने हा क्षण टिपला आहे. यासंदर्भात “सीएनएन न्यूज”ने आपल्या एका वृत्तात म्हटले आहे की, फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
NEW: The FAA has launched an investigation after two planes nearly collided at New York’s Syracuse Hancock International Airport.
A commercial flight was forced to abort the landing when an airplane taking off nearly ran into the plane.
The planes came within just… pic.twitter.com/jW5pyqZCeM
— Collin Rugg (@CollinRugg) July 10, 2024
कधी घडली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्क विमानतळावरुन उडालेली दोन्ही विमाने व्यावसायिक कंपन्यांची होती. एक फ्लाइट PSA Airlines 5511 आणि दुसरी Endeavour Air 5421 होती. 8 जुलै रोजी सकाळी 11:50 वाजता ही घटना घडली. ATC ने PSA Airlines 5511 ला Syracuse Hancock आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानापासून वेगळे होण्याचे निर्देश दिले. त्याच धावपट्टीवरून तो टेक ऑफ करत होता.
‘इतके’ प्रवासी होते
वॉशिंग्टनहून येणारे PSA फ्लाइट आणि न्यूयॉर्कला जाणारे एंडेव्हर एअर फ्लाइट एकमेकांपासून सुमारे 700-1000 फूट अंतरावर उभे होते. PSA एअरलाइन्स 5511 मध्ये 75 प्रवासी आणि चार क्रू सदस्य होते. त्याच वेळी, एंडेव्हर एअर 5421 मध्ये 76 प्रवासी आणि चार क्रू सदस्य होते. यामध्ये दोन पायलट आणि दोन फ्लाइट अटेंडंटचा समावेश होता. या घटनेत कोणी जखमी झाल्याची माहिती नाही.
तज्ज्ञ काय म्हणतात
मात्र, दोन्ही विमानांमध्ये टक्कर होण्याची शक्यता सारखी नव्हती, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु एअर ट्रॅफिक कंट्रोल ऑडिओने वेगळी सूचना दिली. सीबीएस न्यूजनुसार, ट्रॅफिक कंट्रोलने सुरुवातीला PSA 5511 ला उतरण्यासाठी क्लीअरींग दिले आणि त्याच रनवे 28 वरून एंडेव्हर एअर 5421 ला टेकऑफ करण्यासाठी क्लिअर केले.