अमृतसर : अमृतसर येथून एक धकाकड्याक बातमी समोर येत आहे. सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला आहे. एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या लोकांनी गोळीबार करणाऱ्या आरोपीला रोखलं व त्याला ताब्यात घेतलं. नारायण सिंह असं आरोपीचं नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुखबीर सिंग बादल यांना धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यासाठी ते सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसून होते. यावेळी अचानक एक व्यक्ती आला व त्याने सुखबीर सिंग बादल यांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्याला तात्काळ पकडलं. आरोपी खालसाशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
गळ्यात फलक आणि हातात भाला..
शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांना धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली आहे. गळ्यात फलक आणि हातात भाला घेऊन ते सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसले असताना त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. 2 डिसेंबरला श्री अकाल तख्त साहीबने त्यांना ही शिक्षा दिली आहे. 2007 ते 2017 दरम्यान पंजाबमध्ये सत्तेवर असताना त्यांच्या पक्षाने आणि सरकारने केलेल्या चुकीबद्दल श्री अकाल तख्त साहीबने त्यांना ही शिक्षा सुनावली आहे. नारायण सिंहने सुखबीर बादल यांच्यासमोर जाऊन बंदूक बाहेर तेवढ्यात तिथे उपस्थित असलेले त्याला रोखण्यासाठी त्याच्या दिशेने पळाले. त्यावेळी नारायण सिंहला नरोखल्यामुळे त्याने हवेत गोळीबार केला.
#WATCH | Punjab: Bullets fired at Golden Temple premises in Amritsar where SAD leaders, including party chief Sukhbir Singh Badal, are offering ‘seva’ under the religious punishments pronounced for them by Sri Akal Takht Sahib, on 2nd December.
Details awaited. pic.twitter.com/CFQaoiqLkx
— ANI (@ANI) December 4, 2024
हल्ल्यामागील कारण काय?
आरोपी हा खलिस्तान समर्थक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बेअदबी प्रकरणामुळे तो सुखबीर बादल यांच्यावर नाराज असल्याच बोललं जात आहे. शीख धर्मगुरुंकडून धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर सुखबीर सिंग बादल यांनी काल सेवादार म्हणून सेवा दिली. आज त्यांच्या ‘तनखाह’ म्हणजे शिक्षेचा दुसरा दिवस होता. काल बादल यांनी निळ्या रंगाचा सेवादारचा पोषाख परिधान केला होता. हातात भाला घेऊन व्हीलचेअरवर बसून ते सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर तैनात होते.