दिल्ली : राजधानी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना बघायला मिता आहे. अशातच आप पक्षाला मोठा झटका बसला आहे. पंजाबमधील आमदार गरप्रीत बस्सी गोगी यांचा डोक्यात गोळी लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. बायको-मुलं घरात असताना गोगी यांनी स्वत:वर गोळी झाडली असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
काही रिपोर्ट्सनुसार, बंदूक साफ कराताना गोगी यांना गोळी लागल्याचे समजते. पोलीस तपास करत आहेत. आमदाराचा मृतदेह घरात पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पंजाबमधील लुधियाना पश्चिम मतदारसंघाचे आपचे आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू झाला. गोगी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘आप’च्या आमदाराचा मृत्यू कसा झाला, अचानक गोळी कशी लागली? त्यांनी ‘स्वतःवर’ गोळी झाडली की दुसऱ्याने गोळी झाडली? याबाबत अद्याप कोणताही ठोस माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून याचा तपास केला जात आहे. गोगी यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
डीसीपी जसकरण सिंह तेजा यांनी आप आमदाराच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, ‘त्यांना मृत अवस्थेत डीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. ही घटना रात्री 12 वाजता घडली.’ पोलिस आयुक्त कुलदीप चहल आणि उपायुक्त जितेंद्र जोरवाल हे डीएमसीएचमध्ये उपस्थित आहेत. आप आमदाराच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृतदेहाचे पोस्टमार्टम केले जात आहे.
#WATCH | Ludhiana, Punjab: DCP Jaskaran Singh Teja says, ” Gurpreet Gogi was declared brought dead at the hospital, his body has been kept at the mortuary in DMC hospital. Post-mortem will be conducted. As per the family members, he shot himself accidentally, he sustained bullet… https://t.co/sZEFYD9bdc pic.twitter.com/xqGPCMnlj1
— ANI (@ANI) January 11, 2025
नेमकं काय घडलं?
गुरप्रीत गोगी यांनी मध्यरात्री 12 वाजता स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. पोलिसांकडून कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. गुरप्रीत गोगी शुक्रवारी एका सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर संध्याकाळी उशिरा घरी पोहोचले. जेवण करून आपल्या खोलीत गेले. त्यानंतर थोड्यावेळात खोलीतून गोळीबार झाल्याचा आवाज आला. आवाज ऐकताच त्यांच्या पत्नी डॉ. सुखचैन बस्सी खोलीकडे धावल्या. खोलीत गोगी रक्ताच्या धारोळ्यात पडलेले दिसून आले. हे पहिल्यानंतर पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली. गुरप्रीत गोगी यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.