छत्तीसगड: छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात एका अकरावीत शिकणाऱ्या मुलीनं बाळाला जन्म दिला आहे. तिनं शाळेतच नवजात मुलीला जन्म दिला असून, नंतर बाळाला तिन शौचालयाच्या खिडकीतून खाली फेकून दिल्याची धक्कादायकघटना उघडकीस आल्यानंतर, अधिक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणी आरोग्य महिला आणि बाल विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मुलीची प्रकृती गंभीर असल्याकारनाने तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
छत्तीसगडच्या पोडी गावातली शासकीय निवासी शाळेत एका अकरावीत शिकत असलेल्या विद्यार्थीनीने बाळाला जन्म दिला आहे. ही धक्कादायक बाब मंगळवारी उघडकीस आल्यानंतर परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झालं आहे. याप्रकरणाबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थीनीने सातव्या किंवा आठव्या महिन्यातच बाळाला जन्म दिला आहे. ज्यामुळे मुलीची प्रकृती गंभीर आहे.
मंगळवारी पोडी गावातील एका शासकीय निवासी शाळेत वसतिगृह अधिक्षकांना १७ वर्षीय मुलगी आजारी असल्याची माहिती मिळाली होती. या शाळेत वसतिगृह देखील आहे. ही शाळा आदिवासी विकास विभागामार्फत चालवली जाते. अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थीनी रडत असल्यामुळे तिला रूग्णालयत नेण्यात आले. जिथे तिने मान्य केले की तिने एका मुलीला जन्म दिला होता. मुलीला जन्म दिल्यानंतर तिने मुलीला खिडकीतून बाहेर फेकून दिले.
वसतिगृह अधिक्षक निलंबित
या प्रकरण, कोरबा जिल्ह्यातील दंडाधिकारी अजित वसंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी गरोदर असल्याची माहिती नसल्यामुळे वसतिगृह अधिक्षकांना निष्काळजीपणाच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आलं आहे. यासंदर्भात आरोग्य महिला आणि बाल विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी, कोरबा मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ सांगतात, मुलीला नवजात शिशु वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिच्या डाव्या फुफ्फुसावर जखमेच्या खुणा आहेत. मुलीची प्रकृती चिंताजनक आहे.