नवी दिल्ली : युक्रेनच्या युद्धकैद्यांना घेऊन जाणारे रशियाचे विमान कोसळले आहे. रशियाचे इल्युशिल इल-76 हे लष्करी विमान 65 बंदी सैनिकांना घेऊन जात होते. विमान खाली कोसळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. विमान कोसळल्याचा मोठा स्फोट झाला होता. या भीषण स्फोटात विमानातल्या जवळपास 65 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रशियन संरक्षण मंत्रालयानेही विमानात कोण कोण होतं याबाबत माहिती दिली आहे.
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अपघात झालेलं IL-76 लष्करी वाहतूक विमान होते. विमानामध्ये युक्रेनचे पकडलेले 65 सैनिक होते. या सैनिकांना बेल्गोरोड या भागात नेलं जात होतं. युक्रेनियन युद्धकैद्यांना युक्रेनला नेलं जात होतं. मृतांमध्ये या सैनिकांमध्ये सहा क्रू मेंबर्स आणि तीन एस्कॉर्ट यांचा समावेश होता.
⚡️An Ilyushin Il-76 military plane reportedly crashed in the #Belgorod region of Russia, as reported by Russian Telegram channels.
There is no official information about the incident yet. pic.twitter.com/N2IdHdGfQZ
— KyivPost (@KyivPost) January 24, 2024
IL-76 लष्करी वाहतूक विमान हे सैनिकांसह लष्करी उपकरणे वाहून नेण्यासाठी त्याचा वापर केला जातो. यामध्ये पाच लोकांचा क्रू असतो. या विमानामध्ये एकावेळी 90 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. जवळपास दीड वर्षांपासून या दोन्ही देशांमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या सैनिकांची देवाणघेवाण केलीये. रशियाने युक्रेनच्या 230 बंदीसैनिकांची सुटका केली आहे. तर युक्रेन देशानेही रशियाच्या 248 सैनिकांची सुटका केलीये.