Reserve Bank of India : गेल्या काही दिवसांपासून देशात धमकीचे कॉल्स आणि ई-मेल्सचा ओघ थांबत नाही. अशातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा मेल आला आहे. या मेलमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी, भारतीय रिझर्व्ह बॅंकेला (RBI) त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर धमकीचा ईमेल आला आहे.
RBI गव्हर्नरच्या मेल आयडीवर रशियन भाषेतील ई-मेल आला आहे. मेल मिळाल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून त्यांनी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात मेल पाठवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, आरबीआयला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करुन आरबीआयला उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.
Mumbai | A threatening email was received on the official website of Reserve Bank of India. The email was in Russian language, warned to blow up the bank. A case has been registered against unknown accused in Mata Ramabai Marg (MRA Marg) police station. Investigation into the…
— ANI (@ANI) December 13, 2024