चेन्नई : RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांची प्रकृती अचानक खालावली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शक्तीकांत दास यांना आरोग्याची किरकोळ समस्या (अॅसिडिटीची तक्रार) होती. काळजी करण्याची गरज नसल्याचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी यावेळी म्हटले आहे.
RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या प्रकृतीबाबत रिझर्व्ह बॅंकेनेही एक निवेदन जारी केले आहे. यावेळी निवेदनात आरबीआयने म्हटले आहे की, शक्तीकांत दास यांनी अॅसिडिटीची तक्रार केल्यानंतर त्यांना तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच काळजी करण्यासारखे काही नसून काही तासांतच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल.