Industrialist Ratan Tata Died : जगातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे बुधवारी (दि.10) ऑक्टोबर रोजी वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. टाटा समुहाचा विस्तार रतन टाटा यांनी केला. मोठे उद्योगपती या सोबतच ते समाज सेवक देखील होते. त्यांनी टाटा समुहाचं साम्राज्य विस्तारलं. रतन टाटा यांनी कधीही लग्न केले नाही हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर 3800 कोटी रुपयांच्या संपत्तीचा उत्तराधिकारी कोण असणार? हा प्रश्न सर्वाना पडला आहे.
टाटा समूहाची धुरा सांभाळणारे रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. गेल्या दीडशे वर्षांपासून ते टाटाची परंपरा पुढे नेत होते. 3800 कोटींच्या संपत्तीसह रतन टाटा गेल्या अनेक दशकांपासून टाटा समूहाला विकासाच्या दिशेने नेत होते.
रतन टाटांच्या निधनानंतर उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या कुटुंबातील नोएल टाटा यांचं नाव प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत आहे. नवल टाटा आणि त्यांची दुसरी पत्नी सिमोन यांच्या पोटी जन्मलेल्या नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहे. त्यामुळे रतन टाटांच्या निधनानंतर मोठे असलेले नोएल टाटा हेच त्यांच्या संपत्तीचे वारसदार असू शकतात, अशी चर्चा सुरु आहे.
नोएल टाटा यांची दुसरी पत्नी सिमोन यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. मात्र, त्याचे वाढते वय लक्षात घेता त्याच्या तीन मुलांपैकी कोणत्याही एकाला या उद्योगाची जबाबदारी दिली जाऊ शकते. लिया टाटा, माया टाटा आणि नेव्हिल टाटा या तीन मुलांचा समावेश आहे. ज्यांना टाटा उद्योग समूहाचे संभाव्य वारसदार म्हणून पाहिले जाते.
सर्वात मोठी लिआ टाटा यांनी स्पेनमधील माद्रिद येथील आयई बिझनेस स्कूलमधून मार्केटिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. 2006 मध्ये त्या टाटा समुहात ताज हॉटेल रिसॉर्ट्स अँड पॅलेसमध्ये असिस्टंट सेल्स मॅनेजर म्हणून रुजू झाल्या आणि आता इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (आयएचसीएल) मध्ये अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
धाकटी मुलगी माया टाटा यांनी टाटा कॅपिटलमध्ये समूहाच्या प्रमुख वित्तीय सेवा कंपनीत विश्लेषक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तसेच त्यांचे बंधू नेव्हिल टाटा यांनी ट्रेंटमध्ये आपला व्यावसायिक प्रवास सुरू केला. कंपनीची रिटेल चेन तयार करण्यात त्यांच्या वडिलांनी मदत केली. नेव्हिल यांनी टोयोटा किर्लोस्कर समुहाच्या मानसी किर्लोस्कर यांच्याशी विवाह केला आहे. नेव्हिल हे स्टार बाझारचे प्रमुख आहेत. ही कंपनी हायपरमार्केट चेन ट्रेंट लिमिटेड अंतर्गत येते.
दरम्यान, टाटा समुहाचं साम्राज्य विस्तारण्यात रतन टाटांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा सन्सने नवी उंची गाठली आणि जगभर आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. रतन टाटा समुहाचा वटवृक्ष देखील वाढवला आहे. टाटांच्या अनेक पिढ्यांनी उभा केलेला हा वटवृक्ष कोण वाढवणार? रतन टाटांचा उत्तराधिकारी कोण असणार? असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत.