व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Thursday, May 22, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तिसऱ्यांदाही आम्हीच सत्तेत येऊ; लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 16 March 2024, 18:09

दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीसाठी भाजपा-एनडीए पूर्णपणे तयार आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा पुन्हा आपण सत्तेत येऊ, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुकीचा कार्यक्रम तब्बल 2 महिने चालणार आहे. तर मतदान प्रक्रिया सात टप्प्यात मतदान होणार जोणार आहे. या मतदान प्रक्रियेला 19 एप्रिलपासून सुरुवात होईल. तर 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

The biggest festival of democracy is here! EC has announced the 2024 Lok Sabha election dates. We, the BJP-NDA, are fully prepared for elections. We are going to the people on the basis of our track record of good governance and service delivery across sectors.…

— Narendra Modi (@narendramodi) March 16, 2024

 

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

“लोकशाहीच्या सर्वात मोठ्या सणाला सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. भाजपा-एनडीए या निवडणुका लढवण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. सुशासन आणि सार्वजनिक सेवेच्या आमच्या रेकॉर्डच्या आधारे आम्ही लोकांमध्ये जाऊ. 140 कोटी कुटुंबातील सदस्य आणि 96 कोटी मतदारांचे पूर्ण स्नेह आणि आशीर्वाद आपल्याला सलग तिसऱ्यांदा मिळतील असा मला विश्वास आहे,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, 140 कोटी देशवासीयांच्या सामर्थ्याने आणि शक्तीने आपला देश दररोज विकासाचे नवे विक्रम रचत आहे. आज आपण जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत आणि करोडो भारतीय गरीबीतून बाहेर आले आहेत. आपल्या सरकारच्या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचल्या आहेत. आम्ही 100 टक्के देशवासीयांपर्यंत पोहोचण्याचे काम केले आहे आणि त्याचे परिणाम आमच्यासमोर आहेत.

एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात गरिबी आणि भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा अधिक तीव्र होणार आहे. सामाजिक न्यायासाठी आमचे प्रयत्न आणखी वाढतील. आम्ही वेगाने भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवू. तरुणांची स्वप्ने साकार करण्यासाठी आमचे प्रयत्न अधिक ताकदीने पुढे जातील. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

प्रामाणिक, दृढनिश्चयी आणि प्रबळ इच्छाशक्ती असलेले सरकार किती काही करू शकतं याची जाणीव आज प्रत्येक भारतीयाला होत आहे. त्यामुळेच आपल्या सरकारकडून प्रत्येक देशवासीयांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. म्हणूनच आज भारताच्या कानाकोपऱ्यातून आणि समाजाच्या प्रत्येक घटकातून 400 के पार हा एकच आवाज ऐकू येत आहे.

“आम्ही देशाची सूत्रं जेव्हा 10 वर्षांपूर्वी हाती घेतली, तेव्हा देश आणि नागरिक इंडिया आघाडीच्या चुकीच्या कारभारामुळे त्रस्त होते. असं एकही क्षेत्र नव्हतं जिथे घोटाळा सुरु होता. देश निराशेच्या गर्तेत गेला होता आणि जगानेही भारतावर विश्वास ठेवणे सोडलं होते. त्या परिस्थितीतून आम्ही देशाला बाहेर काढले आणि आज भारत झपाट्याने प्रगती करत आहे. 140 कोटी कुटुंबातील सदस्य आणि 96 कोटी मतदारांचे पूर्ण स्नेह आणि आशीर्वाद आपल्याला सलग तिसऱ्यांदा मिळतील. असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Daund News : न्यायालयात साक्ष दिल्याच्या रागातून शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला ; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल, दौंड तालुक्यातील घटना

Thursday, 22 May 2025, 14:31

कदमवाकवस्ती येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी स्थळाची पोलीस उपायुक्तांकडून पाहणी

Thursday, 22 May 2025, 14:20

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रला जोडण्यासाठी उभारण्यात येणार ५४० मीटर लांबीचा केबल स्टे ब्रिज

Thursday, 22 May 2025, 13:54
Maharashtra guardian ministers may change

महाराष्ट्रातील पालकमंत्री कंटाळले, आता चेंज हवा; लांबच्या जिल्ह्यास जाण्यास अनेक मंत्र्यांची टाळाटाळ

Thursday, 22 May 2025, 13:45

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राजेंद्र हगवणेसह मुलगा शशांकची हकालपट्टी

Thursday, 22 May 2025, 11:51

पुण्यातील रिंगरोडसाठी ४० वर्ष टोलवसुली, अडीच वर्षात काम होणार पूर्ण

Thursday, 22 May 2025, 11:16
Next Post

डोकं शांत ठेवून निर्णय घ्या; रविंद्र धंगेकरांचा वसंत मोरेंना सल्ला!

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.