प्रयागराज: महाकुंभ बुकिंगच्या नावाखाली बनावट संकेतस्थळाद्वारे सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा प्रयागराज पोलिसांनी शुक्रवारी पर्दाफाश केला आहे. महाकुंभातील कॉटेज, तंबू, हॉटेल्स आदींचे बुकिंग बोगस संकेतस्थळावरून करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस उपायुक्त (शहर) अभिषेक म्हणाले की, अटक करण्यात आलेल्यांकडून तीन लॅपटॉप, सहा अँड्रॉइड फोन आणि सहा एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. चौकशीत आरोपींनी कबूल केले की, त्यांनी कॉटेज, तंबू, हॉटेल्स इत्यादी बुकिंगसाठी नावाने विविध बनावट संकेतस्थळांची निर्मिती केली होती.
याद्वारे निवास, व्हीआयपी मुक्काम, दर्शन आदी विविध प्रकारची सुविधा उपलब्ध करू देण्यात येत होती. आकर्षक आमिषे दाखवून याद्वारे यात्रेकरूंची सायबर फसवणूक केली जात आहे. पंकज कुमार, यश चौबे, अंकित कुमार गुप्ता आणि अमन कुमार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.