Port Blair Name Changed : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी (13सप्टेंबर) एक मोठी घोषणा केली. केंद्र सरकारने अंदमान निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं आहे. पोर्ट ब्लेअर बंदर हे आता ‘श्री विजयपुरम’ या नावाने ओळखलं जाणार आहे.
अमित शहा यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत याची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून मुक्त करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प आहे. या संकल्पापासून प्रेरित होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचं नाव ‘श्री विजयपुरम’ असं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘श्री विजयपुरम’ हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यामधील अंदमान निकोबरचं योगदान दर्शवत राहील”.
पोर्ट ब्लेअर म्हणजेच श्री विजयपुरम ही अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी आहे. नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध इतिहास आणि साहसी क्रियाकलापांसाठी प्रसिद्ध असलेले शहर. हे शहर भारताच्या पूर्व किनाऱ्यापासून सुमारे 1,200 किलोमीटर अंतरावर आहे.
पोर्ट ब्लेअरचा इतिहास ब्रिटिश राजवटीशी जोडलेला आहे. ब्रिटिशांनी या बेटाचा वापर तुरुंग म्हणून केला होता. आजही येथे सेल्युलर जेल आहे, ज्याला काला पानी असेही म्हणतात. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारकांना कैद करण्यासाठी या तुरुंगाचा वापर करण्यात आला.
देश को गुलामी के सभी प्रतीकों से मुक्ति दिलाने के प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के संकल्प से प्रेरित होकर आज गृह मंत्रालय ने पोर्ट ब्लेयर का नाम ‘श्री विजयपुरम’ करने का निर्णय लिया है।
‘श्री विजयपुरम’ नाम हमारे स्वाधीनता के संघर्ष और इसमें अंडमान और निकोबार के योगदान को…
— Amit Shah (@AmitShah) September 13, 2024