नवी दिल्ली : देशात आणि राज्यात सर्वात चर्चेत राहिलेली वादग्रस्त पूजा खेडकरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. कालच (३१ जुलै) ला यूपीएससीने पूजा खेडकरच आयएएस पद काढून घेतलं होतं. त्यानंतर आता दुसरीकडे न्यायालयानेही पूजा खेडकरला चांगलाच दणका दिला आहे. न्यायालयाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. त्यामुळे तिला आता कोणत्याही क्षणाला अटक होऊ शकते.
यूपीएससीने दिल्ली पोलिसांकडे पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबत आता नायालयाने निकाल दिला आहे. त्यामुळे पूजा खेडकरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
कोणत्याही वेळी होऊ शकते अटक..
यूपीएससीमध्ये खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करत पूजा खेडकरविरुद्ध दिल्लीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आहे. त्यामध्ये आपल्याला अटक होऊ नये, यासाठी पूजा खेडकरने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने नाकारला असून त्यामुळे पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.