गुवाहाटी : आसाममध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पोहोचली. एकीकडे देश राममय झााला आहे. तर दुसरीकडे भाजप मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा सरकारकडून राहुल गांधींना विरोधाचा सामना करावा लागत आहे. आज (22 जानेवारी) ला बोर्डोवा थानमध्ये जाण्यावर ठाम असलेले राहुल गांधी यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात न जाता सोमवारी दुपारी तीननंतर तेथे जावे, असे व्यवस्थापन समितीने म्हटले आहे. पोलिसांनीही राहुल गांधींना रोखले. त्यावरून राहुल गांधी यांनी आज फक्त एकच व्यक्ती मंदिरात जाऊ शकते का? असे विचारले.
मी का जाऊ शकत नाही? काय चूक केली ?
आम्हाला तिथे बोलावण्यात आले होते आणि आता तुम्ही जाऊ शकत नाही असे सांगितले जात आहे. मी का जाऊ शकत नाही? मी काय चूक केली आहे? मला फक्त जाऊन हात जोडायचे आहेत, आदर द्यायचा आहे. मी जाऊ शकत नाही, असे प्रशासन सांगत आहे, मग मी का जाऊ शकत नाही? अशी विचारणा राहुल यांनी केली. याचे कारण विचारतोय असे राहुल म्हणाले.
बारदोवाचे महत्व काय?
बारदोवा थान हे 15व्या-16व्या शतकातील सामाजिक-धार्मिक सुधारक आणि आसामी संत श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थान परिसरात वसलेले आहे. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जोगेंद्र नाथ देव महंत यांनी रविवारी दुपारी बारदोवाचे काँग्रेस आमदार शिबामोनी बोरा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अनेक संस्थांनी भक्तिमय कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.
काय म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
यापूर्वी आज आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 22 जानेवारी रोजी बारदोवा येथील श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थानाला भेट देणे टाळावे. ते म्हणाले की, प्रभू राम आणि मध्ययुगीन वैष्णव संत यांच्यात स्पर्धा होऊ शकत नाही. हिमंता बिस्वा शर्मा म्हणाले की, राहुल गांधींनी अनावश्यक स्पर्धा निर्माण करू नये, हे आसामसाठी दुःखदायक असेल.