लोकसभा निवडणूक निकालाचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळाले आहे. नवीन सरकार स्थापनेपूर्वी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवला आहे. तसेच जुनी लोकसभा भंग करण्याची शिफारस केली आहे. दरम्यान, नवीन सरकार स्थापनेवर चर्चा करण्यासाठी 7 जून रोजी एनडीएची दिल्लीत बैठक होणार आहे.
Prime Minister Narendra Modi called on President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan. The Prime Minister tendered his resignation along with the Union Council of Ministers. The President accepted the resignation and requested the Prime Minister and the Union Council of Ministers… pic.twitter.com/SHIj1UMWpY
— ANI (@ANI) June 5, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला असून, नव्या सरकारची स्थापना होईपर्यंत त्यांना आणि त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाला कामकाज पाहण्याची सूचना राष्ट्रपतींनी दिली आहे.