मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी एका विशेष विमानाने देवघर आणि त्यानंतर हेलिकॉप्टरने जमुईला गेले होते. त्यानंतर परतीच्या प्रवासादरम्यान पंतप्रधान मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभेसाठी झारखंडमध्ये गेले होते. सभा आटोपून परतत असताना, त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. पायलटने तातडीने देवघर विमानतळावर उतरवलं आहे. त्यामुळे मोदींना दिल्लीला परतण्यास विलंब झाला आहे. विमानात नेमकी काय बिघाड झाली होती, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा आधीच त्यांच्या व्यस्त कार्यक्रमाचा भाग होता आणि या अनपेक्षित विलंबामुळे त्यांच्या पुढील योजनांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. याआधी पीएम मोदी जमुईमध्ये होते. बिहारमधील जमुई येथून ते देवघरला पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.
Prime Minister Narendra Modi’s aircraft experienced a technical snag due to which the aircraft has to remain at Deoghar airport causing some delay in his return to Delhi. pic.twitter.com/8IKaK6yttz
— ANI (@ANI) November 15, 2024