नवी दिल्ली: सोमवारी राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” जाहीर केली आहे. या योजने अंतर्गत एक कोटी घरांच्या छतावर रूफटॉप सोलर बसवले जाईल. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली. देशातील नागरिकांच्या घरावर त्यांच्या मालकीचे सोलर सिस्टीम असावी, यासाठी ही योजना सुरू करण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
“जगातील सर्व भक्तांना सूर्यवंशी भगवान श्री रामाच्या भक्तीतून नेहमीच ऊर्जा मिळते. आज अयोध्येतील अभिषेक सोहळ्याच्या शुभमुहूर्तावर भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी, हा माझा संकल्प आणखी दृढ झाला आहे.” असं मोदी यांनी म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले, “मी अयोध्येहून परतल्यानंतर पहिला निर्णय घेतला आहे की, आमचे सरकार 1 कोटी घरांवर रूफटॉप सोलर बसवण्याचे लक्ष्य घेऊन ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करणार आहे. यामुळे केवळ गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी होणार नाही, तर भारत ऊर्जा क्षेत्रातही आत्मनिर्भर होईल
सूर्यवंशी भगवान श्री राम के आलोक से विश्व के सभी भक्तगण सदैव ऊर्जा प्राप्त करते हैं।
आज अयोध्या में प्राण-प्रतिष्ठा के शुभ अवसर पर मेरा ये संकल्प और प्रशस्त हुआ कि भारतवासियों के घर की छत पर उनका अपना सोलर रूफ टॉप सिस्टम हो।
अयोध्या से लौटने के बाद मैंने पहला निर्णय लिया है कि… pic.twitter.com/GAzFYP1bjV
— Narendra Modi (@narendramodi) January 22, 2024