नवी दिल्ली : देशभरात नवरात्र उत्सवाचा जल्लोष सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवी दुर्गासाठी स्वतः लिहिलेल्या एक गीताचा व्हिडिओ सोशल माध्यम ‘एक्स’वर टाकला. हे गीत गायल्याबद्दल त्यांनी गायिका पूर्वा मंत्री यांचे आभार मानले. नवरात्रीच्या मंगलकाळात लोक वेगवेगळ्या पद्धतीने उत्सव सादर करत आहेत.
श्रद्धा आणि आनंद यामुळे प्रेरित होऊन ‘आवती कलाय’ हे गरबा गीत मी देवी दुर्गाच्या शक्ती व सामर्थ्याला अभिवादन म्हणून लिहिले आहे. आपल्या सर्वांवर देवीची कृपा अशीच कायम राहो, असे मोदींनी सोशल माध्यम ‘एक्स’वरून म्हटले. गायिका पूर्वा मंत्री यांनी मोदींनी लिहिलेले गीत गाण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
It is the auspicious time of Navratri and people are celebrating in different ways, united by their devotion to Maa Durga. In this spirit of reverence and joy, here is #AavatiKalay, a Garba I wrote as a tribute to Her power and grace. May Her blessings always remain upon us. pic.twitter.com/IcMydoXWoR
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2024