MP Plane Crash : मध्य प्रदेशमध्ये विमान कोसळल्याची घटना घडली आहे. गुना विमानतळावर विमान क्रॅश झाल्याचे सांगण्यात येत आहे. या विमानाने नीमचहून सागरकडे उड्डाण केले होते. यानंतर विमानाच्या महिला पायलटने गुना येथे आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली होती. लँडिंग दरम्यान विमानाचा अचानक तोल गेला. त्यानंतर विमान कोसळले. या विमान अपघातात महिला पायलट नॅन्सी मिश्रा जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विमानाच्या इंजिनमध्ये काही बिघाड झाला होता. त्यानंतर महिला पायलटने गुना एरोड्रोमवर विमान उतरवण्याची परवानगी मागितली होती. दरम्यान, धावपट्टीवर उतरत असताना विमान तलावाच्या काठावरील झुडपात पडले. ही माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.
तसेच अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. जखमी पायलटला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून व्हिडिओमध्ये अपघातग्रस्त विमान दिसत आहे. घटनास्थळी पोलिसांचा ताफाही दिसत आहे. सध्या या विमान अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे.
VIDEO | A female pilot was injured after a flight training academy’s plane crashed at Madhya Pradesh’s Guna Aerodrome earlier today. pic.twitter.com/hkGTgV8OER
— Press Trust of India (@PTI_News) March 6, 2024