Petrol-Diesel Price : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार आता मोठं पाऊलं उचलण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार लवकरच पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पाच ते दहा रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सरकारी इंधन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा विचार करत आहेत. डिसेंबर २०२३ च्या तिमाहीत इंधन कंपन्यांचा नफा ७५००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. हे पाहता कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करू शकतात. कंपन्यांचं हे पाऊल महागाईवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतं. हिंदुस्तान टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिल आहे.
सरकारी फ्युअल रिटेलर्सनं एप्रिल २०२२ नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. आता कंपन्यांनी किंमतीचा आढावा घेण्याचे संकेत दिले आहेत. अधिकार्यांनी सूचित केले आहे की तेल विपणन कंपन्यांना प्रति लिटर १० रुपये प्रॉफिट मार्जिन असू शकते, जो आता ग्राहकांना दिला जाण्याची शक्यता आहे.