Parliament Security Breach : संसद घुसखोरी प्रकरणातील आरोपींची नार्को आणि पॉलीग्राफी टेस्ट करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांचे ब्रेन मॅपिंगही केले. या टेस्ट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना दिल्लीत आणले. मात्र, आता पोलिसांनी घुसखोरी प्रकरणातील मास्टरमाईंड कोण याबाबत मोठा खुलासा केला आहे. संसद घुसखोरी प्रकरणाचा मास्टरमाईंड ललीत झा नसून मनोरंजन डी असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलय.
संसदेचे अधिवेशन सुरु असताना काही आरोपींनी बरोजगारी आणि शेतकरी समस्यांवर आवाज उठवण्यासाठी संसदेत घुसखोरी केली होती. लोकसभेत आणि संसदेच्या बाहेर तरुणांनी धुराच्या नळकांड्या फोडल्या यानंतर या प्रकरणी सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होते. त्यातील मुख्य आरोपीचे नाव समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे, नीलम आजाद, ललित झा आणि महेश कुमावत या 6 आरोपींना शनिवारी पटीयाला उच्च न्यायालयात हजर केलं होतं. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नीलम वगळता इतर पाच आरोपींना पॉलीग्राफी टेस्टसाठी गुजरातमध्ये आणण्यात आलं होतं. सागर आणि मनोरंजनचीही नॅरो आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात आली होती. नीलमने या टेस्टसाठी सहमती दर्शवली नाही. त्यामुळे तिला या टेस्टसाठी नेण्यात आलेलं नव्हतं. इतर आरोपींच्या मात्र, टेस्ट करण्यात आल्या आहेत.