सिरोही : अंगणवाडी सेविका बनवण्याच्या आमिषाने अध्यक्ष व आयुक्तांनी पंधरा ते वीस महिलांना बोलावले आणि अमानुष बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी राजस्थानच्या सिरोही नगरपरिषदेचे अध्यक्ष महेंद्र मेवाडा आणि तत्कालीन आयुक्त महेंद्र चौधरी यांच्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची तक्रार पाली जिल्ह्यातील एका महिलेने केली होती. त्यानुसार सिरोही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केलेल्या आरोपानुसार, अध्यक्ष व आयुक्तांनी मला व इतर पंधरा ते वीस महिलांना आमिष दाखवून बोलावले. यानंतर सामूहिक बलात्कार झाला. व्हिडीओ बनवून महिलांना ब्लॅकमेल केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात केला आहे.
याबाबत बोलताना पीडितेने महिलेने सांगितले की, दोन-तीन महिन्यांपूर्वी ती अंगणवाडीत काम करण्यासाठी तिच्या सहकारी महिलांसोबत सिरोही येथे आली होती. यावेळी त्यांनी अध्यक्ष आणि आयुक्तांची भेट घेतली. अध्यक्ष व आयुक्तांनी आम्हा सर्व महिलांना त्यांच्या ओळखीच्या घरी मुक्काम करून खाण्यापिण्याची व्यवस्था केली. या वेळी जेवणातून गुंगीचे औषध देण्यात आले. यानंतर सभापती व आयुक्तांनी त्यांच्या साथीदारांनी महिलांवर बलात्कार केला. महिलांना जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्यांचे डोके दुखत होते, त्यांच्या अंगावरील कपडे अस्ताव्यस्त झाले होते. त्याचवेळी तिथे सभापती व आयुक्तांसह त्यांचे १०-१५ साथीदार होते.
दरम्यान, या प्रकाराबात त्यांना विचारले असता, हे सर्वजण हसू लागले. धक्कादायक म्हणजे, याचसाठी तुम्हाला इथे बोलावले होते, असे त्यांनी सांगितले. एवढ्यावरच न थांबता, त्यांचे व्हिडीओ काढून ५ पाच लाख रुपये मागितले जात होते. नाहीतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती. आरोपींनी व्हिडिओही बनवल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
महिलेच्या आरोपांनुसार, महिलांकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मागणी करत हे लोक ब्लॅकमेल करत आहेत. यासोबतच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली जात आहे. त्याचबरोबर ते इतर लोकांबरोबर अवैध संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत आहेत. या आरोपींनी नोकरीच्या बहाण्याने महिलांकडून कोरे कागद आणि स्टँप पेपरवर सह्याही घेतल्या आहेत.