Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nupur Bora: 6 वर्ष सरकारी नौकरी अन् कमावली करोडोंची माया; कोण आहे नुपूर बोरा? वाचा सविस्तर…  

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 17 September 2025, 16:05
Nupur Bora: 6 years of government service and earned crores of rupees; Who is Nupur Bora? Read in detail...

फोटो-सोशल मिडिया

Nupur Bora: आसाम सिव्हिल सर्व्हिस (एसीएस) अधिकारी नुपूर बोरा त्यांच्या घरातून सुमारे 2 कोटी रुपये रोकड आणि दागिने जप्त केल्यानंतर सोमवारी अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विशेष दक्षता कक्षाच्या छाप्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली.

 

जमवलेल्या संपत्तीमध्ये गुवाहाटी येथील निवासस्थानातून सुमारे 94 लाख रुपये रोकड आणि मौल्यवान दागिने तर बारपेटा येथील भाड्याच्या घरातून आणखी 10 लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा (Chief Minister Himanta Biswa Sharma on Nupur Bora) यांनी या प्रकरणी सांगितले की, नुपूर बोरा यांच्यावर वादग्रस्त जमिनीच्या प्रकरणाशी संबंध असल्याच्या आरोपांवरून सहा महिन्यांपासून गुप्तपणे पाळत ठेवण्यात आली होती. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

कोण आहे नुपूर बोरा? (Nupur Bora)

नुपूर बोरा 2019 मध्ये आसाम नागरी सेवेत रुजू झाल्या असून त्या सध्या 34 वर्षांच्या आहेत. त्यांचा जन्म 31 मार्च  1989 रोजी झाला. त्या गोलाघाट जिल्ह्यातील असून, कामरूप जिल्ह्यातील गोरोईमारी येथे सर्कल ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या.

त्यांनी गुवाहाटी विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात कला शाखेची पदवी घेतली असून कॉटन कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. नागरी सेवेत येण्यापूर्वी त्यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत (DIET) व्याख्याता म्हणून काम केले आहे.

त्यांनी कार्बी आंगलोंग येथे सहाय्यक आयुक्त म्हणून प्रशासनिक कारकिर्दीची सुरुवात केली आणि मार्च  2019 ते जून 2023 दरम्यान ही पदे सांभाळली. नंतर जून  2023 पासून बारपेटा येथे सर्कल ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आणि नंतर कामरूप येथे बदली झाली.

सहा वर्षांच्या सेवेत नुपूर बोरा यांनी अधिकृत पगाराच्या तुलनेत प्रचंड संपत्ती जमवली असल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या मालमत्तेत मोठ्या प्रमाणात रोख रकमाही असल्याचा आरोप आहे.

गोलाघाट येथील रहिवासी नुपूर बोरा  2019 मध्ये नागरी सेवेत प्रवेश करताना एक मेहनती आणि  कडक शिस्तीच्या अधिकारी म्हणून ओळखल्या जात होत्या. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर व्यवहारांशी संबंधित आरोपांच्या आधारे गुप्तपणे पाळत ठेवण्यात आली होती.

समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे स्वीकारल्याचे सांगितले जात असून, सध्या या प्रकरणाचा तपास  सुरू असल्याने त्या देशभरात चर्चेत आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुण्यात भोंदूचा कारनामा! ‘माझ्या अंगात दैवीशक्ती आहे, मी तुझी समस्या दूर करेल’ म्हणत महिलेला लॉजवर बोलावलं अन् घडलं भयंकर…

Sunday, 12 April 2026, 21:57

कात्रज-कोंढवा रस्ता कोंडीतून मुक्त होणार! भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; जून २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प

Sunday, 12 April 2026, 21:16

“साखळाई प्रकल्पावरून पाण्याचा संघर्ष भडकणार? घोड धरणातील हक्काच्या पाण्यासाठी शिरूर-श्रीगोंदा आमनेसामने”

Sunday, 12 April 2026, 20:37

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 20:21
Pune Metro

Pune : पुढील 4 वर्षांत खडकवासला-खराडी मेट्रो धावणार! लाईन 4 आणि 4 ए प्रकल्पाचा असा असेल नकाशा

Sunday, 12 April 2026, 20:08
Yewala

Yewala : लग्न लावून द्यायचे अन् 2 लाख उकळायचे, काही दिवसांतच नवरी व्हायची पसार; एजंटांचा धक्कादायक प्लॅन पाहून पोलीसही चक्रावले..

Sunday, 12 April 2026, 19:43
Next Post

Pune News : पीएमपीकडून ई-बस कंपनीला दणका; 55 कोटींचा दंड वसूल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.