पाटणा : बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा पलटी मारत भाजपसोबत जाणार आहेत. लालू-तेजस्वी यांना सोडून नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. नितीश आणि भाजपमध्ये डील फायनल झाली असून नव्या सरकारचा फॉर्म्युलाही निश्चित झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नितीशकुमार कधीही राजीनामा देऊ शकतात. 28 जानेवारीला नितीश कुमारही भाजपसोबत जाऊन शपथ घेऊ शकतात, असा दावा सूत्रांकडून करण्यात येत आहे. पण बिहारमध्ये प्रत्येक क्षणाला बदलणाऱ्या राजकीय घडामोडींमध्ये हे इतकं सोपं नाही. नितीश यांची वृत्ती पाहून आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र तेजस्वी प्रसाद यांनी सरकार वाचवण्यासाठी विचारमंथन सुरू केले आहे. लालूप्रसाद यादव यांनीही पहिली चाल केली आहे.
वास्तविक, बिहारमध्ये सरकार स्थापनेची स्पर्धा फिफ्टी-फिफ्टी आहे. भाजपशी हातमिळवणी करून नितीशकुमार बिहारमध्ये सहज एडीए सरकार स्थापन करतील, असे वाटत असले, तरी पण आकड्यांच्या खेळात हे सोपे वाटत नाही. कारण तेजस्वी यादव यांनी फोडाफोडीचे राजकारण केले तर प्रकरण मधेच अडकेल आणि परिस्थिती कोणत्याही दिशेने बदलू शकते. जागांच्या बाबतीत राजद हा बिहारमध्ये अजूनही सर्वात मोठा पक्ष आहे. लालू प्रसाद यादव यांनी पहिली चाल करत जीतन राम मांझी यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. आरजेडीने जीतन राम मांझी यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे.
लालू यादव यांनी केली पहिली चाल
खरे तर बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांनी नितीश यांच्या राजकीय खेळींचा पराभव करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आरजेडीने जीतन राम मांझी यांचा मुलगा संतोष कुमार सुमन यांना उपमुख्यमंत्री करण्याची ऑफर दिली आहे. सध्या जीतनराम मांझी यांच्याकडे चार आमदार आहेत. एवढेच नाही तर राजदने असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष AIMIM कडेही पाठिंबा मागितला आहे. ओवेसी यांचे बिहारमध्ये आमदार आहेत. याशिवाय अपक्षांचाही पाठिंबा मिळेल अशी आशा राजदला आहे. जीतनराम मांझी आणि ओवेसी यांच्या आरजेडी आघाडीला पाठिंबा मिळाल्यास तेजस्वी आणखी काही बंदोबस्त करून बिहारमध्ये मोठा खेळ करू शकतात आणि नितीश यांची योजना वाया जाऊ शकते.
आकड्यांच्या खेळात तेजस्वी कसे यशस्वी होऊ शकतात
बिहारमध्ये कोणाची किती सत्ता आहे, हे समजून घेण्यासाठी जागांचे अंकगणित समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या बिहारमध्ये आरजेडीकडे ७९ जागा आहेत. काँग्रेसच्या 19 जागा, सीपीआय (एमएल)च्या 12 जागा, सीपीआय (एम)च्या 2 जागांसह आरजेडी आघाडीच्या जागांची संख्या 112 वर पोहोचली आहे. तर बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 122 आहे. आता, जर आरजेडीजितन राम मांझी यांचा पक्ष एचएएमचे 4 आमदार, 1 एआयएमआयएम आमदार आणि 1 अपक्ष आमदारांना आपल्या गोटात आणण्यात यशस्वी झाला, तर आरजेडी आघाडीला एकूण 118 जागा मिळतील. अशा स्थितीत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आणखी ४ आमदारांची गरज आहे. जर तेजस्वी यादव यांना जेडीयूच्या चार आमदारांना फोडण्यात यश आले तर बिहारमध्ये काहीतरी वेगळे घडण्याची शक्यता आहे.
काय आहे नितीश यांचे समीकरण?
दुसरीकडे, नितीश एकत्र आल्याने भाजप आघाडीला म्हणजेच एनडीएला सरकार स्थापन करणे सोपे वाटते. सध्या बिहारमध्ये आरजेडीनंतर भाजपच्या सर्वाधिक जागा आहेत. एनडीएचा घटक असलेल्या भाजपकडे 78 आणि जितन राम मांझी यांच्या एचएएमकडे चार आमदार आहेत. अशा स्थितीत नितीश यांची जेडीयू एनडीएचा भाग बनली तर एनडीएकडे 127 जागा होतील, ज्या सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा आहेत. बिहारमध्ये विधानसभेच्या सदस्यांची संख्या 243 आहे आणि बहुमताचा आकडा 122 आहे. पण तेजस्वी यांनी जेडीयू फोडण्यात यश मिळवले आणि इतरांना त्यांच्या गोटात आणले, तर नितीशकुमार यांना भाजपसोबत सरकार स्थापन करणे सोपे जाणार नाही. मात्र, बिहारच्या राजकारणात काय होणा? हे काही काळात कळेलच.