नवी दिल्ली : भारतात न्यायव्यवस्था ही देशातील सर्वांसाठी एक मोठी व्यवस्था आहे. आता भारतातील न्यायव्यवस्थेसाठी प्रतिकात्मक असलेल्या न्यायदेवतेच्या पुतळ्याच्या स्वरूपात आता मोठा बदल करण्यात आला आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवण्यात आली आहे. तसेच तिच्या एका हातात तराजू तर दुसऱ्या हातात तलवारीऐवजी भारतीय संविधान दिसत आहे. न्यायाधीशांच्या लायब्ररीमध्ये हा नवीन स्वरूपाचा पुतळा बसवण्यात आला आहे.
आता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या आदेशानुसार न्यायदेवतेच्या मूर्तीत बदल करण्यात आले आहेत.
न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवून न्यायदेवता अंध नाही/कायदा अंध नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच कायदा व्यवस्था भारतीय संविधानावर आधारित असल्याचं नमूद करण्यासाठी न्यायदेवतेच्या हातातील तलवारीची जागा आता भारतीय संविधानाने घेतली आहे.
नव्या न्यायदेवतेच्या मूर्तीची वैशिष्ट्ये..
-न्यायदेवतेची नवी मूर्ती पांढऱ्या शुभ्र रंगाची आहे.
-ही मूर्ती भारतीय वेशभूषेत आहे.
-साडी, डोक्यावर मुकूट, कपाळावर टिकली, कानात व गळ्यात पारंपरिक आभूषणं दिसत आहेत.
-न्यायदेवतेच्या एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात संविधान आहे.
खरे तर न्यायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या न्यायालयांमध्ये ठेवलेल्या पुतळ्याला ‘लेडी जस्टिस’ म्हणून ओळखले जाते. आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर काळी पट्टी होती. आता ती हटवण्यात आली आहे.
Lady Justice in SC library now holds a Constitution with open eyes
⚖️In an initiative shedding the colonial imprint and traditional attributes, the statue of Lady Justice, in the judges’ library of the Supreme Court, now holds a copy of the Indian Constitution, instead of a… pic.twitter.com/ocgXfmai70
— All India Radio News (@airnewsalerts) October 16, 2024