New Delhi News : नवी दिल्ली : भारतीय लोकशाहीचे मंदिर असा गौरव होणाऱ्या संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय लोकशाहीचे मंदिर असा गौरव होणाऱ्या संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. (Inauguration of the new Parliament building with blessings from interfaith priests)
या उद्घाटनाला भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाची नेतेमंडळी उपस्थित आहेत.नवं संसद भवन हे त्याच्या उद्घाटनामुळे जितकं चर्चेत आहे तितकंच त्यावरुन होणाऱ्या वादामुळेही चर्चेत आहे. (New Delhi News) काँग्रेससह १९ पक्षांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना या उद्घाटन सोहळ्याला का बोलवलं गेलं नाही? राष्ट्रपतींच्या हस्तेच या नव्या संसदेचं उद्घाटन व्हायला पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
या कार्यक्रमाची सुरवात पूजा आणि होमहवन याने झाली. (New Delhi News) त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘सेंगोल’समोर पूजाविधीनंतर साष्टांग दंडवत घातला त्यानंतर नव्या संसद भवनाच्या बांधकामात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कर्मचारी आणि तज्ज्ञांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (New Delhi News)
नव्या संसदेत सर्व धर्मीयांकडून प्रार्थना
नव्या संसदेत सर्व धर्मीयांकडून प्रार्थना करण्यात आली. या माध्यमातून सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी यांच्यासह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आदि नेते उपस्थित आहेत. (New Delhi News) यावेळी बौद्ध, जैन, पंजाबी, शीख, मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू आदि सर्वधर्म प्रार्थना सोहळा पार पडत आहे.
नवी संसद ही वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. नव्या संसद भवनाच्या उभारणीसाठी तब्बल ८६२ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
सोनू सूदने IAS विद्यार्थ्यांसाठी सुरू केलं मोफत कोचिंग ; ट्विट करीत दिली माहिती…!