New Delhi News : नवी दिल्ली : महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. अनेक वस्तू आणि सेवांचे दर आवाक्याबाहेर जाताना दिसत आहे. असे असताना आता देशातील सर्वसामान्य जनतेला दिलासादायक असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. खाद्यतेल आणखी स्वस्त होणार आहे. कारण सरकारने रिफाइंड सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क 17.5 टक्क्यांवरून 12.5 टक्के केले आहे. याचा फायदा अनेकांना होणार आहे.
सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क कमी
गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलांच्या किंमतींमध्ये घसरण होताना दिसत आहे. त्यात आता पुन्हा एकदा खाद्यतेल स्वस्त होणार आहे. याबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. त्यामध्ये देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि किमती नियंत्रित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. (New Delhi News) सरकारने रिफाइंड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. या कपातीमुळे रिफाइंड खाद्यतेलांवरील प्रभावी शुल्क 13.7 टक्क्यांवर पोहोचले आहे. सर्व प्रमुख कच्च्या खाद्यतेलांवरील प्रभावी शुल्क 5.5 टक्के आहे.
खाद्यतेलांच्या किमती नियंत्रणात ठेवण्याच्या तयारीत
केंद्र सरकार खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार, पावले देखील उचलली जात आहे. क्रूड आणि रिफाइंड सोयाबीन आणि सूर्यफूल तेल यांच्यातील कमी शुल्क फरक असूनही रिफाइन्ड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. (New Delhi News) या निर्णयाचा बाजारातील भावावर तात्पुरता परिणाम होईल, असे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
New Delhi News : मोठी बातमी! साक्षी मलिकची अचानक आंदोलनातून माघार
New Delhi News : नवीन संसदभवनाच्या उद्घाटन प्रसंगी सर्वधर्मीय धर्मगुरूंकडून मंत्रोच्चारासह आशीर्वाद
New Delhi : काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार; डझनभर राज्यांचे अध्यक्ष बदलणार? काय आहे रणनिती?