Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोरोना व्हायरसचा नवा धोका! XEC प्रकार 27 देशांमध्ये पसरला, जाणून घ्या किती आहे धोकादायक?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 September 2024, 18:06
New Covid variant XEC is spreading fast in Europe: Know all about it

नवी दिल्ली: जगभरात लाखो लोकांचा बळी घेणाऱ्या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. या वर्षी जूनमध्ये जर्मनीच्या बर्लिनमध्ये कोरोना विषाणू XEC (MV.1) चे नवीन प्रकार समोर आले होते. माहितीनुसार, हा प्रकार जगभरात वेगाने पसरत आहे. स्क्रिप्स रिसर्चच्या आउटब्रेक डॉट इन्फो पेजवर 5 सप्टेंबर रोजी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील 12 राज्ये आणि 15 देशांमध्ये या प्रकाराचे 95 रुग्ण आढळले आहेत. ऑस्ट्रेलियाचे डेटा इंटिग्रेशन स्पेशालिस्ट माइक हनी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली आहे. आगामी काळात हा प्रकार Omicron च्या DeFLuQE प्रमाणे आव्हान बनू शकतो, अशी भीती माईक हॅनी यांनी व्यक्त केली आहे.

 

अमेरिकेत वाढत आहेत KP.3 स्ट्रेनची प्रकरणे 
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) नुसार, या महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये Omicron प्रकाराचा KP.3.1.1 स्ट्रेन (DeFLuQE म्हणून ओळखला जातो) वरचढ ठरला आहे. 1 ते 14 सप्टेंबर दरम्यान, या प्रकाराचे सुमारे 52.7% रुग्ण अमेरिकेत आढळले. शास्त्रज्ञांचे म्हणण्यानुसार XEC प्रकार ज्या वेगाने पसरत आहे, तो लवकरच KP.3 प्रकारानंतरचा दुसरा सर्वात मोठा धोका बनू शकतो.

अहवालानुसार, जर्मनी, डेन्मार्क, ब्रिटन आणि नेदरलँडमध्ये XEC प्रकारची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. या प्रकारात काही नवीन उत्परिवर्तन देखील होत आहेत, ज्यामुळे हिवाळ्यात ते वेगाने पसरू शकते. तथापि तज्ञ म्हणतात की, लस त्याला प्रतिबंधित करण्यासाठी प्रभावी आहे.

XEC चा वेगवान प्रसार होण्याची भीती
XEC प्रकाराबाबत, स्क्रिप्स रिसर्च ट्रान्सलेशनल इन्स्टिट्यूटचे संचालक एरिक टोपोल म्हणतात की ही फक्त सुरुवात आहे. हा प्रकार येत्या काही आठवड्यांत किंवा महिन्यांत अधिक वेगाने पसरू शकतो, ज्यामुळे कोरोना विषाणूची आणखी एक लाट येऊ शकते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, पूर्वीच्या तुलनेत आता कमी चाचण्या घेतल्या जात आहेत, ज्यामुळे हा विषाणू किती पसरला आहे, हे शोधणे सध्या कठीण आहे.

डेटा स्पेशालिस्ट माईक हनी यांच्या म्हणण्यानुसार, भारतातील महाराष्ट्रात प्रथम या प्रकाराची पुष्टी झाली, त्यानंतर अमेरिकेसह इतर 9 देशांमध्ये XEC (MV.1) प्रकाराचे रुग्ण आढळले. चीन, युक्रेन, पोलंड आणि नॉर्वेमधील रुग्णांमध्येही या प्रकाराची पुष्टी झाली आहे.

Recombinant variant XEC is continuing to spread, and looks a likely next challenger against the now-dominant DeFLuQE variants (KP.3.1.1.*).

Here are the leading countries reporting XEC. Strong growth in Denmark and Germany (16-17%), also the UK and Netherlands (11-13%).
???? pic.twitter.com/rLReeM9wF8

— Mike Honey (@Mike_Honey_) September 15, 2024

XEC प्रकारांची लक्षणे काय आहेत?
या प्रकाराची लक्षणे देखील ताप आणि सर्दीसारखी आहेत. यामध्ये खूप ताप, अंगदुखी, थकवा, खोकला आणि घसा खवखवणे जाणवू शकते. याशिवाय श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी, चव आणि वास कमी होणे, उलट्या आणि जुलाब यांसारखी लक्षणे दिसू शकतात. कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या बहुतेक लोकांना काही आठवड्यांतच बरे वाटू लागते, परंतु या प्रकाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांना बरे होण्यास जास्त वेळ लागतो.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कर्जाच्या विळख्यातून सुटका! राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कर्जात मोठी सवलत

Wednesday, 8 April 2026, 9:46

अमेरिका सांगतंय अन् पाकिस्तान लिहितंय? मध्यस्थीचा आणला आव; शरीफ यांच्या ‘Draft’ ट्विटने जगात खळबळ

Wednesday, 8 April 2026, 9:39

बलात्कारही केला अन् जमिनीही हडपल्या! भोंदू खरातच्या पापाचा घडा भरला; नराधमाला होणार कठोर शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 9:20

ती आत कपडे बदलत होती अन् नीच दुकानदार कॅमेऱ्यातून पाहत होता; पुण्यातील संतापजनक घटना

Wednesday, 8 April 2026, 9:04

शिंदेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ‘या’ मंत्र्यांना डच्चू देणार; काम न करणाऱ्या नेत्यांची आता खैर नाही!

Wednesday, 8 April 2026, 8:45

पाकिस्तानने केलेल्या मध्यस्थीनंतर इराण-अमेरिका युद्ध थांबले; ट्रम्प म्हणाले…..

Wednesday, 8 April 2026, 8:17
Next Post

गणेश विसर्जनादरम्यान नीरा नदीत तरुण बुडाला; प्रशासनाकडून शोध सुरु, घटनेने इंदापूरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.