तेहरान: इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणवर मोठा लष्करी हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या अमेरिकेने अखेर दोन आठवड्यांसाठी हल्ला न करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणची रणनीती आणि पाकिस्तानने केलेली मध्यस्थी यामुळे हे युद्ध तूर्तास टळले असून जगाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
अमेरिकेने इराणच्या अणुकेंद्रांवर क्षेपणास्त्र हल्ल्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र, इराणने ‘ह्यूमन शील्ड’चा वापर करून अमेरिकेला पेचात पाडले. इराणने आपल्या महत्त्वाच्या पॉवर प्लांट्स आणि अणुकेंद्रोभोवती हजारो तरुणांना तैनात केले. जर अमेरिकेने हल्ला केला असता, तर मोठ्या प्रमाणात नागरी जीवितहानी झाली असती, ज्यामुळे ट्रम्प प्रशासनावर आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धगुन्ह्यांचे ताशेरे ओढले गेले असते. ट्रम्प यांनी याला “बेईमानी” म्हटले असले, तरी लष्करी कारवाई थांबवणे त्यांना भाग पडले.

या संपूर्ण वादात पाकिस्तानने अनपेक्षितपणे मध्यस्थाची भूमिका बजावत 10 सूत्रीय शांतता प्रस्ताव पाठवला. या प्रस्तावामुळे पुढील दोन आठवडे दोन्ही देशांमध्ये ‘युद्धविराम’ पाळला जाईल. विशेष म्हणजे, अमेरिकेसह खंदा समर्थक असलेल्या इस्रायलनेही या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ काय म्हणाले, पाहा
With the greatest humility, I am pleased to announce that the Islamic Republic of Iran and the United States of America, along with their allies, have agreed to an immediate ceasefire everywhere including Lebanon and elsewhere, EFFECTIVE IMMEDIATELY.
I warmly welcome the…— Shehbaz Sharif (@CMShehbaz) April 7, 2026
ट्रम्प म्हणाले, मी दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी हल्ले थांबवण्यास सहमत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी झालेल्या माझ्या चर्चेनुसार आणि त्यांच्या विनंतीनुसार, मी माझ्या सैन्य दलांना माघारी बोलवत आहे. शाहबाज शरीफ यांचे आभार!
ट्रम्प यांनी या युद्धविरामासाठी ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ तात्काळ खुली करण्याची अट घातली आहे. ही सामुद्रधुनी बंद राहिली तर जगात पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या असत्या. दरम्यान, 2 आठवड्यात शांतता करार झाला नाही, तर आखाती देशांमधील परिस्थिती पुन्हा स्फोटक होऊ शकते. सध्याची ही माघार ट्रम्प यांची रणनीती आहे की खरोखर शांततेचा प्रयत्न, हे येणारा काळच ठरवेल.







