तिरुमला : गेल्या काही दिवसांपासून तिरुपती बालाजी मंदिरात प्रसादाबद्दल अनेक बातम्या आपण ऐकल्या आहेत. मंदिरात मिळणाऱ्या लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या आरोपांने देशात खळबळ उडाली होती. अशातच तिरुपती बालाजी देवस्थान पुन्हा एकदा वादात अडकलं आहे. बालाजीच्या प्रसादात किडे आढळल्याचा दावा भक्तांनी केला आहे.
वारंगलचे रहिवासी भक्त चंदू या भक्ताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्यात संपूर्ण घटना सांगितली आहे. दुपारच्या जेवणाच्या प्रसादात किडे आढळून आल्याचे आरोप भक्ताने केले आहे. मात्र, मंदिराच्या प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
वारंगलचे रहिवासी भक्त चंदू यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी ते प्रसादासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना प्रसादात किडे आढळले. त्यावेळी भक्ताने सांगितले की, दही भातामध्ये किडे आढळले आहेत, परंतु मंदिरातील प्रशासनाने अशी कोणतीही घटना घडली नाही असे सांगितले आहे.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर मंदिराच्या कर्मचा-यांनी चंदू आणि इतर भाविकांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनात बदल होऊनही अशाच समस्या कायम असल्याचे सांगत चंदू यांनी सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.
Big Breaking News 🗞️⚡#Andrapradesh #Tirumala
Jerry in curd rice at Annadana Center in Tirumala
Jerry in the leaf of a devotee eating at the TTD Madhava Nilayam Annadana Kendra
Devotees questioned the management of TTD on the appearance of Jerry in Annaprasad. pic.twitter.com/Qgv16hTvAm
— Just A Fan 🪓 (@sigma_bhAAi) October 5, 2024