सिक्कीम : सिक्कीममध्ये सदूला मुसळधार पाऊस सुरु असून मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. भूस्खलनामुळे सिक्कीममधील रस्ते आणि पुलांचे बरेच नुकसान झाले असल्याची माहिती मिळत आहे. अशातच आता भूस्खलनाचा धडकी भरवणारा एक थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व सिक्कीममध्ये मंगळवारी सकाळी भूस्खलन झाले. त्यामुळे राज्यातील एक वीज केंद्र जवळपास पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून येथे सातत्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडत असून ५१० मेगावॅट वीज केंद्राला लागून असलेली टेकडी धोक्यात आली होती. मंगळवारी सकाळी टेकडीचा मोठा भाग कोसळला आणि नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनच्या तिस्ता स्टेज ५ धरणाचे पॉवर स्टेशन ढिगाऱ्याखाली दाबल्या गेले. पूर्व सिक्कीममधील सिंगताम येथील दिपू दराजवळील बलुतार येथे ही दुर्घटना घडली आहे.
Major Landslide in Sikkim!
Horrifying Visuals. Praying for everyone’s safety🙏🏻
pic.twitter.com/lOq78imnVI— Mumbai Nowcast (@s_r_khandelwal) August 20, 2024
लोकांचा आक्रोश अन् भूस्खलन..
या मोठ्या दुर्घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये, भूस्खलनात पॉवरहाऊसच्या दिशेने मोठे दगड आणि मोडतोड वेगाने घडत असल्याचे दिसत असून त्यामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. व्हिडीओमध्ये मोठ्या खडकाचा एक भाग कोसळत असून, काही वेळाने त्याचा मोठा भाग वीज केंद्रावर पडत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अशातच सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्याअंतर्गत सिक्कीममधील अनेक भागांतील रस्ते बंद झाले आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या दुर्घटनाही घडल्याचे समोर येत आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एस. आर. खंडेलवाल या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओतील निसर्गाचे रौद्र रूप पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत.