नवी दिल्ली : बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रुद्राक्ष फेकून दिले, मला मातोश्रीमधलं सगळं माहित आहे, पण मी अजून सांगितलेलं नाही, बाळासाहेबांनी माझ्याकडून शब्द घेतला होता म्हणून मी शांत आहे, मी कुठल्याच ठाकरेंबद्दल वाईट काही करणार नाही असं बाळासाहेबांना सांगितलं होतं, म्हणून मी शांत आहे, असा घणाघात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे.
इंडिया आघाडीच्या दिल्लीत रामलीला मैदानात झालेल्या सभेत अनेक नेत्यांनी पीए मोदी आणि अमित शाहांवर टीका केली. त्या सभेला उद्धव ठाकरेही हजर होते. मुख्यमंत्री असताना मंत्रालयात गेले नाही पण विरोधी आघाडीच्या सभेला दिल्लीला जातात. उद्धव ठाकरेंचे 5 खासदर आणि 16 आमदार आहेत, येत्या निवडणूकीत त्यांचे 10 आमदारही राहणार नाहीत, असं राणे यांनी म्हटलं आहे. तुमची बौद्धिक लायकी काय ? तुमची किंमत चटणी इतकी पण नाही अशी टीकाही राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
कोरोनाकाळात सगळी माध्यमं पिछाडीवर होती, त्या काळात सामना मात्र नफ्यात होता, काळापैसा पांढरा करण्याचे हे काम होतं. कोरोनाकाळात मोदींनी 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं. भाजप ठगांचा पक्ष मग वर्षानुवर्षे आमच्या सोबत राहिल्याने तू पण ठग झालास का ? असा सवाल राणेंनी उद्धव ठाकरें विचारल आहे. देवेंद्र फडणवीस नुकतेच लडाखला जाऊन आले, फडणवीस पक्ष सांगेन तिथं जाउज येतात, फडणवीसांनी तुम्हाला पाच वर्षे सांभाळलं ते कसं हे मला माहित आहे, असंही राणे यांनी म्हटलं आहे.