CM Yogi Adityanath Death Threat : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांना आज सकाळी जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी काही तासातच ही धमकी देणार्या संशयित तरुणीला ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधून ताब्यात घेतले आहे.
फातिमा खान (वय-24) असे पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणीचे नाव आहे.
मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांनी 10 दिवसात राजीनामा नाही दिला तर त्यांना बाबा सिद्दीकीसारखे मारु, असा मेसेजेमध्ये उल्लेख करुन धमकी देण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, फातिमा खान ही उच्चशिक्षित तरुणी आहे. मात्र तिची मानसिक स्थिती ठीक नाही. मुंबईच्या दहशतवादी विरोधी पथक आणि उल्हासनगर पोलिसांनी एकत्रितपणे केलेल्या कारवाईत संशयित तरुणीला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासानंतर मुंबई पोलीसांना फातिमा खानला अटक केली आहे.
हा मेसेज फातिमाच्या नंबरवरुन पाठवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.