ढाका: नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांनी गुरुवारी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली. राजधानी ढाका येथील राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान बंगा भवन येथे शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मोहम्मद युनूस शपथ घेण्यासाठी बंगा भवनात पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांच्यासोबत अन्य १६ सहकाऱ्यांनीही शपथ घेतली असून त्यात 2 महिला आणि 2 हिंदूंचाही समावेश आहे.
देशात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या दरम्यान, नवीन अंतरिम सरकारचे प्रमुख बनलेल्या मोहम्मद युनूस यांना पाठिंबा देण्यासाठी इतर 16 लोकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व नाही. युनूससोबत सईदा रिझवाना हसन, महिला कार्यकर्त्या फरीदा अख्तर, ब्रिगेडियर (निवृत्त) सखावत हुसेन आणि माजी परराष्ट्र सचिव तौहीद हुसैन यांच्यासह 16 जणांचा सल्लागार समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.