Mother Killed Son : उत्तर गोव्यातील कळंगुट परिसरातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका आईने आपल्या चार वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मुलाने वडिलांना भेटू नये म्हणून तीन हे कृत्य केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आईला 8 जानेवारी अटक केली आहे. सुचना सेठ असं आरोपी महिलेच नाव आहे. ही महिला बेंगळुरूमधील एआय स्टार्टअपमध्ये सीईओ म्हणून काम करते. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिलेने गोव्यात तिच्या 4 वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या केली. त्यानंतर ती त्याचा मृतदेह एका पिशवीत टाकून बेंगळुरूला पळून जाण्याच्या तयारीत होती. यावेळी कर्नाटक पोलिसांनी चित्रदुर्गात सुचनाच्या बॅगची झडती घेतल्यानंतर तिच्या बॅगेत मुलाचा मृतदेह सापडला.
यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.
पोलिसांनी अधिक तपास केला असता, आरोपी महिलेने मुलांनी वडिलांना भेटू नये म्हणून हे भयंकर कृत्य केल्याच समोर आलं आहे. सुचना सेठचे 2010 मध्ये लग्न केलं. 2019 मध्ये मुलाला तिनं जन्म दिला. मात्र, पतीसोबत वाद झाल्यानंतर २०२० मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यावेळी न्यायालयाने मुलाच्या वडिलांना दर रविवारी भेटता येईल, असा निकाल दिला होता. मात्र या निकालावर सुचना सूचना नाराज होती.
म्हणून सुचानाने केली मुलाची हत्या
सुचना आपल्या पतीपासून विभक्त झाली होती. त्यामुळे आपल्या मुलाने त्याच्या वडिलांना भेटावे असं तिला अजिबात वाटत नव्हत. याच कारणामुळे आरोपी महिलेने आपल्या मुलाला वडिलांना भेटण्यापासून रोखण्याचा कट रचला. त्यासाठी ती 6 जानेवारीला गोव्यात पोहोचली आणि सिन्क्वेरिममधील हॉटेलमध्ये गेली. 7 जानेवारी रविवार असल्याने वडील आपल्या मुलाला भेटणार होते, पण त्याआधीच सुचनाने हॉटेलच्या खोलीत मुलाची निर्घृण हत्या केली.
असा झाला खुनाचा उलगडा?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुचना सेठने आपल्या मुलाचा धारदार शस्त्राने खून केला. खून केल्यानंतर तिने हॉटेल व्यवस्थापनाला बेंगळुरूला परत जाण्यासाठी टॅक्सी बुक करण्यास सांगितले. या महिलेने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडे आग्रह धरला की, ती रस्त्यानेच बेंगळुरूला जाईल. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी कॅब बुक केली आणि ती तिचे सामान घेऊन निघून गेली. मात्र, हॉटेलचे कर्मचारी त्यांची खोली साफ करण्यासाठी आले असता त्यांना बेडवर रक्ताचे डाग दिसले.
येथे मोठी घटना घडल्याचा संशय हॉटेल कर्मचाऱ्यांना आला. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ हॉटेल गाठून सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. फुटेज तपासले असता ती हॉटेलमधून एकटीच बाहेर पडल्याचे दिसून आले, तर तिचा मुलगा तिच्यासोबत कुठेही दिसला नाही. पोलिसांना मोठा अनुचित प्रकार घडल्याचा संशय आला.
त्यावरून पोलिसांनी तात्काळ हॉटेलच्या कर्मचार्यांकडून कॅब चालकाचा नंबर घेतला आणि सुचना यांच्याशी बोलले. यावेळी सुचनाने सांगितले की, तिचा मुलगा गोव्यात तिच्या एका नातेवाईकाकडे आहे. त्याच्या नातेवाईकाचा पत्ताही त्याने पोलिसांना दिला. मात्र पोलीस तपासात ही कथा पूर्णपणे खोटी असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांना संशय आल्याने चालकाला त्यांनी फोन करून जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले.