पुणे : ज्यांना मान्सून आवडतो त्यांना हवामान विभागाकडून एक महत्त्वाची माहिती देण्यात येत आहे. नैऋत्य मान्सून मालदीव, कोमोरिनच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागासह निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबतची माहिती सांगण्यात आली आहे. यावेळी गेल्या 24 तासात निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
Good News ☔☔
Considering widespread rainfall over Nicobar Islands in past 24 hrs,winds & OLR conditions,#SouthwestMonsoon has advanced???? into some parts of #Maldives & #Comorin area & some parts of South #BayOfBengal, #Nicobar Islands & South #AndamanSea today, 19 May, 2024. pic.twitter.com/sGLpe9b0GV— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 19, 2024
केरळमध्ये मान्सून 31 मे रोजी दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. साधारणपणे मान्सून 1 जूनला केरळमध्ये दाखल होतो. पण यावर्षी मान्सून एक दिवस आधीच म्हणजे 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. असे असले तरी तीन चार दिवस मागे पुढेही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 30 मे ते 4 जून दरम्यान मान्सून भारतात येण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मान्सून हा अंदमान निकोबार बेटांवर येतो. दरवर्षीचा विचार करता अंदमान बेटावर तो 21 मे ला दाखल होत असतो. पण यावेळी तो दोन दिवस आधीच येणार आहे. गेल्यावर्षीही मान्सून अंदमानमध्ये 19 मे या दिवशी आला होता. पण केरळमध्ये नऊ दिवस उशिराने आला. यंदा देशात मान्सून सरासरी पेक्षा जास्त म्हणजेच 106 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.