मुंबई: स्वतःच्या हक्काचे पक्के घर असावे, हे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. हेच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी केंद्र सरकारची ‘प्रधानमंत्री आवास योजना’ (PMAY) पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरु झाली आहे. सध्या या योजनेसाठीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, ग्रामीण आणि निमशहरी भागातील बेघर कुटुंबांसाठी ही एक सुवर्णसंधी चालून आली आहे.

देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गटातील (LIG) नागरिकांना कच्च्या झोपडीतून पक्क्या घरात स्थलांतरित करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी 2.50 लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक अनुदान दिले जाते. ज्या कुटुंबाकडे देशात कुठेही स्वतःच्या मालकीचे पक्के घर नाही, असे कुटुंब या योजनेसाठी पात्र ठरू शकते. केवळ अनुदानच नाही, तर लाभार्थ्यांना बँकांकडूनकमी व्याजदरात गृहकर्ज देखील उपलब्ध करून दिले जाते.
कसा कराल अर्ज? (अर्ज प्रक्रिया)
अर्ज करण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी आणि पारदर्शक करण्यात आली आहे:
-
ऑनलाइन पद्धत:
pmaymis.gov.inया अधिकृत पोर्टलवर जाऊन स्वतःची नोंदणी करू शकतात. -
ऑफलाइन पद्धत: ज्यांना ऑनलाइन अर्ज करणे जमत नाही, त्यांनी जवळच्या ‘सीएससी’ (CSC) केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पूर्तता करावी.
-
कागदपत्रे: अर्जासाठी आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक आणि मालमत्तेची कागदपत्रे आवश्यक आहेत.
योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारने ‘अंगीकार २०२५’ हे विशेष अभियान हाती घेतले आहे. यामध्ये सरकारी अधिकारी थेट लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचून कागदपत्रांची आणि जागेची पडताळणी करत आहेत.







