Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा आधार, सरकारी नोकरीचा जुगाड; पुण्यातील रॅकेटने उडवली खळबळ; 25 जणांना ठोकल्या बेड्या

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 28 October 2026, 12:08

पुणे: क्रीडा क्षेत्रातील आरक्षणाचा गैरवापर करून सरकारी नोकरी मिळवल्याचा गंभीर प्रकार पुण्यात समोर आला आहे. कुराश या खेळाची बनावट क्रीडा प्रमाणपत्रे सादर करून शासकीय सेवेत प्रवेश मिळवल्याचा आरोप संबंधितांवर आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत 25 जणांना अटक केली असून, त्यामध्ये 14 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अटक केलेल्या काही आरोपींची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू असताना आणखी काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. प्रत्यक्षात कोणत्याही क्रीडा स्पर्धेत सहभागी न होता प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही आरोपी पोलीस दलात भरती झाले होते, तर काहींनी प्रशिक्षणही घेतले होते. प्रशिक्षणासाठी हजर न राहिलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती आहे.

या रॅकेटचे धागेदोरे केवळ पोलीस विभागापुरते मर्यादित नसून अन्य सरकारी विभागांतील भरती प्रक्रियेपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशाच प्रकारे बनावट प्रमाणपत्रांचा वापर करून नोकरी मिळवलेल्या इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पुणे पोलिसांकडून संबंधित सरकारी विभागांशी पत्रव्यवहार सुरू आहे.

दरम्यान, या गुन्ह्यातील 6 आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे.

राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर मेहनत घेऊन यश मिळवणाऱ्या खेळाडूंना सरकारी नोकरीत संधी मिळावी, यासाठी क्रीडा आरक्षणाची तरतूद आहे. मात्र, बनावट प्रमाणपत्रांच्या माध्यमातून या सुविधेचा गैरवापर झाल्याने पात्र खेळाडूंच्या संधी हिरावल्या गेल्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेमुळे सरकारी भरती आणि क्रीडा प्रमाणपत्रांच्या पडताळणी प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा आधार, सरकारी नोकरीचा जुगाड; पुण्यातील रॅकेटने उडवली खळबळ; 25 जणांना ठोकल्या बेड्या

Wednesday, 28 October 2026, 12:08

कोंढावळे बुद्रुकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

Wednesday, 28 October 2026, 12:08

लोकशाही शिकवणारे गुरुजीच मतदानात मागे? पुणे शिक्षक मतदारसंघात तब्बल 1675 मतं बाद; धक्कादायक आकडेवारी समोर!

Wednesday, 28 October 2026, 11:48

दुष्काळाचा मोठा फटका! पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राज्यातील अनेक सहकारी संस्थाच्या निवडणुका स्थगित; हवेली तालुका खरेदी विक्री संघाची मात्र निवडणुक होणार

Wednesday, 28 October 2026, 11:15

जुन्नर तालुक्यातील घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद! चार घरफोड्यांची उकल; 38.50 लाखांचा मुद्देमाल जप्त..

Wednesday, 28 October 2026, 11:10

वाडेबोल्हाई मंदिरात ज्येष्ठ महिलेची दीड तोळ्याची पोत लंपास ; सलग दुसऱ्या रविवारी चोरीची घटना

Wednesday, 28 October 2026, 10:46
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp